22 December 2024 7:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

कर्तव्यदक्ष महिला अधिकारी | गटार स्वच्छ आहे की नाही याची खात्री करण्यासाठी स्वतः गटारात उतरल्या

Bhwandi Women Office

भिवंडी, 10 जून | भिवंडी महानगरपालिकेच्या महिला अधिकारी सुविधा चव्हाण यांचे सध्या सर्वच स्तरांतून कौतूक होत आहे. कारण ही तसेच आहे. महिला अधिकारी असलेल्या सुविधा चव्हाणने गटार स्वच्छ आहे की नाही? हे पाहण्यासाठी चक्क गटारात उतरल्या. तपासणीदरम्यान, त्यांना स्वच्छतेच्या कामावर संशय आला होता. त्यामुळे त्यांनी एका शिडीच्या साह्याने गटारीत उतरत पाहणी केली. काही ठिकाणी त्यांना अपेक्षेप्रमाणे स्वच्छता पाहायला मिळाली. पण अनेक ठिकाणी मात्र घाण दिसल्याने त्यांनी संबंधित आधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच फटकारले. (Suvidha Chavan, a woman officer of Bhiwandi Municipal Corporation, is currently being appreciated from all levels)

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या गटारे साफसफाईचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, हे सर्व काम ठेकेदारांना सोपविण्यात आले होते. संबंधित कामात चुक होऊ नये यासाठी सुविधा चव्हाण सगळीकडे फिरुन मॅनहोलची पाहणी करीत आहे. मंगळवारी चव्हाण या तपासणीसाठी निजामपूर भागाची पाहणी करतानाचा एक व्हिडियो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्या एका गटारीत उतरुन त्यांची पाहणी करीत असल्याचे दिसून येत आहे.

विशेष म्हणजे त्या दिवशी महिला अधिकारी सुविधा चव्हाण यांनी साडी नेसली होती. दरम्यान, त्यांनी आपल्या कंपड्यांची पर्वा न करता आपले काम प्रामाणिकपणे केले. त्यामुळे त्यांचे सर्वच स्तरांतून कौतूक होत आहे. मॅनहोलच्या तपासणीदरम्यान त्यांनी सफाईचे कामगारांशीही संवाद साधला असून त्यांना योग्य काम करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, हा आमचा कामाचा भाग असल्याने असे करताना कोणतीही भीती वाटली नसल्याचे सुविधा चव्हाण म्हणाल्या. जर पावसाळ्यात गटारींची योग्यप्रकारे साफसफाई झाली नाहीतर पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्या पुढे म्हणाल्या की, मी बरेचदा ऐकले होते की, गटारांच्या साफसफाईअभावी अनेकदा पाण्याने भरतात. त्यामुळे आता शहरातील प्रत्येक गटार स्वच्छ आहे याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.

 

News English Summary: Suvidha Chavan, a woman officer of Bhiwandi Municipal Corporation, is currently being appreciated from all levels. Because that’s the way it is. Is the gutter clean by Suvidha Chavan who is a female officer? Chucky went down the drain to see it. During the investigation, they were suspected of cleaning work. So he went down the drain with a ladder. In some places they got to see cleanliness as expected. However, as he saw dirt in many places, he hit the concerned officers and employees well.

News English Title: Suvidha Chavan a woman officer of Bhiwandi Municipal Corporation, is currently being appreciated from all levels news updates.

हॅशटॅग्स

#Bhwandi(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x