15 November 2024 3:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL
x

ठाणे मनसे | एका बाजूला इतर पक्षातील कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश | तर पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Thane MNS, Avinash Jadhav, Monopoly of Avinash Jadhav

ठाणे, २१ नोव्हेंबर: ठाण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाबतीत वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला मोठ्या प्रमाणावर इतर पक्ष तसेच सामाजिक संघटनेतील कार्यकर्ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश करत आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला जुने पदाधिकारी एकामागे एक असे राजीनामे देत अविनाश जाधव यांच्या एकाधिकारशाहीला कंटाळल्याचं कारण देत आहेत. एखादा पदाधिकारी पक्ष सोडताना असे आरोप करत असेल तर संबंधित पदाधिकाऱ्याचं राजकारण असू शकतं. मात्र यापूर्वी देखील राजीनामे देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी हेच एकमेव कारण पुढे करत असल्याने त्याचे दूरगामी परिणाम पक्षाला भोगावे लागू शकतात. शिवसेनेचं ठाण्यातील संघटन अत्यंत मजबूत असल्याने त्यांना काही कार्यकर्ते किंवा पदाधिकारी सोडून घेल्याने काहीच फरक पडणार नाही. मात्र ठाणे मनसेच्या बाबतीत फेसबुकवर तसं चित्र दिसत असलं तरी जमिनीवरील चित्र वेगळं आहे.

आता ठाण्यातील अजून एका पदाधिकाऱ्याने पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीला कंटाळून राजीनामा दिल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले. ओवळा माजिवडा उपविभाग अध्यक्ष प्रलय साटेलकर असे या पदाधिकाऱ्यांचे नाव असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत ठाण्यातूनच पोहोचून दिले जात नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. याआधी डॉ. ओंकार माळी आणि अनिल म्हात्रे या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला होता, आता साटेलकर यांनी राजीनामा दिला आहे.

ठाणे मनसेत तळागाळातील कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना विचारले जात नाही. त्यांना कोणती जबाबदारी दिली जात नाही. राज ठाकरेंवर नाराज नाही. गेले अनेक दिवस पक्षात घुसमट होत होती शेवटी कंटाळून शनिवारी राजीनामा दिल्याचे साटेलकर यांनी सांगितले.

 

News English Summary: Another Thane office-bearer has resigned as he is fed up with party politics. The official said that he was fed up with the dictatorship and dictatorship that had been going on for the last several days. Ovala Majivada sub-division president Pralay Satelkar is the name of these office bearers and he has made a serious allegation that Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray is not being reached from Thane.

News English Title: Thane MNS official resigns accusing monopoly of Avinash Jadhav News updates.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x