23 December 2024 6:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

फॅक्ट-चेक | ट्विटरने २१ मे २०२१'ला सुरु केलेला रिव्हिव्ह प्रोग्रॅम | दिली होती पूर्व सूचना | भाजपकडून राजकारण

Twitter Blue Tick

मुंबई, ०५ जून | केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियासाठी नवीन नियमावली तयार केली होती. यासाठी फेब्रुवारी महिन्यात एक विधेयक लोकसभेत पास करण्यात आले होते. यावरुन केंद्र सरकार आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सध्या आमनेसामने आले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये ट्विटर आणि केंद्र सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे.

मात्र आता फॅक्ट-चेक मध्ये सत्य समोर आलं आहे. कारण ट्विटरने २१ मे २०२१ अधिकृतपणे ट्विट करून नव्याने ब्लू-टिक देणारा प्रोग्रॅम सुरु करण्याची घोषणा केली होती. मात्र तत्पूर्वी रिव्हिव्ह प्रोग्रॅम सुरु करून एन्क महिन्यांपासून वापरात नसलेल्या किंवा लॉगिन देखील न केलेल्या अकाउंटवरील ब्लू-टिक हटविण्याचा निर्णय जाहीर केला होता आणि सदर प्रोग्रॅम हा व्यक्ती केंद्रित नव्हता.

याच पार्श्वभूमीवर ट्विटरने शनिवारी 5 जून रोजी उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांचे वैयक्तिक ट्विटर हँडलवरुन ब्लू टिक हटवले होते. यामध्ये सरसंघचालक मोहन भागवतसह संघाच्या अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. परंतु, वाढता वाद लक्षात घेता ट्विटरने दोन तासानंतर उपराष्ट्रपती नायडू यांचे खाते पूर्ववत केले आहे. त्यामुळे ट्विटरवर या कृत्याबद्दल टीका का होत आहे? यावर ट्विटरचे स्पष्टीकरण काय आहे? चला तर मग समजून घेऊया…

ट्विटरचा ब्लू टिक व्हेरिफिकेशन कार्यक्रम काय आहे?

  1. ट्विटर आणि फेसबुकसह सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने एक व्हेरिफिकेशन कार्यक्रम तयार केला आहे. यानुसार, ब्लू टिक दिले जाते. केंद्र सरकारने फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्येही हा महत्त्वाच्या नियमांचा समावेश होता.
  2. केंद्राने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला म्हटले की, वापरकर्त्यांना त्यांच्या इच्छेनुसार खात्याला व्हेरिफाइड करण्याची परवानगी दिली जावी. कारण यामुळे त्यांच्या चाहत्यांना आपण योग्य व्यक्तीला फॉलो करत असल्याचे कळेल.
  3. त्यानंतरच, ट्विटरने दोन आठवड्यांपूर्वी आपल्या ब्लू टिक पॉलिसीला तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा सक्रिय केले. जर एखादे खाते व्हेरिफाइड असेल खातेधारक आणि चर्चेतील सहभागी लोकांमधील संभाषणे अधिक अर्थपूर्ण आणि माहिती देणारी असल्याचे ट्विटरने म्हटले आहे.

आपणदेखील आपल्या खात्याला व्हेरिफाईड करु शकतो का?

  1. होय. ट्विटर येत्या काही दिवसांत आपल्या युजर्संना सेटिंग्समध्ये व्हेरिफिकेशन अॅप्लिकेशनची सुविधा देणार आहे. त्यामुळे तुम्ही जर ब्लू टिकसाठी अर्ज करणार असेल तर काही दिवसांत तुम्हाला ई-मेलवर उत्तर मिळणार आहे.
  2. ट्विटरने म्हटले आहे की, वापरकर्त्यांना प्रोफाइल नाव, प्रोफाइल फोटो आणि एक कन्फर्म केलेला ईमेलचा पत्ता किंवा फोन नंबर देणे आवश्यक आहे. कारण याच आधारावर ट्विटर आता त्या खात्याला व्हेरिफाइड करणार आहे. त्यामुळे ट्विटरने आपले अर्ज स्विकारलास आपल्या खात्याला ब्लू टिक लागणार आहे.
  3. अर्ज नाकारल्या गेल्यास 30 दिवसांनी पुन्हा अर्ज करता येऊ शकते. या दरम्यान, ट्विटरची बॅकएंड टीम आपल्या खात्यावरून काही अनैतिक, बेकायदेशीर क्रियाकलाप सुरु आहे का? हे तपासते. त्याने बनविलेल्या नियमांची तपासणी केल्यावरच ते ब्लू टिक देणार आहे.

 

News English Summary: The truth has come out in fact-check. Because Twitter officially tweeted on May 21, 2021, announcing the launch of a new blue-tick program. However, earlier it was decided to start a review program and delete the blue-tick on the account which has not been used for months or even logged in, and the program was not person-centered.

News English Title: Twitter blue tick review program in India news updates.

हॅशटॅग्स

#Fact Check(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x