गटारी जवळ आली | शिवसैनिकांकडून अल्प दरात चिकन ऑफर | महागाईतला निवडणूक फंडा
विरार, ०६ ऑगस्ट | राज्यातील अनेक महत्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका काही महिन्यावर आल्या आहेत. त्यामुळे राजकारणी सुद्धा कामाला लागले असून सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी निरनिराळे फडे शोधून काढत आहेत. आपला थोडा आर्थिक फायदा होत असेल तर सामान्य लोकांना देखील त्यामागील राजकारणाशी देणं नसतं हा साधारणपणे कोणत्याही ग्राहकाचा नैसर्गिक स्वभाव जो व्यावसायिक आणि राजकारणी बरोबर ओळखतात. तसाच प्रकार सध्याच्या महागाईमुळे शिवसेनेनं अवलंबल्याचं पाहायला मिळतंय.
वसई विरार महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने स्थानिक शिवसेना पदाधिकारी कामाला लागले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि गटारीच्या निमित्ताने विरारमधील शिवसैनिकांनी भन्नाट शक्कल लढवली आहे. खवय्यांना चक्क अल्प दरात चिकन देण्याचे आमिष दाखवण्यात आले आहे. मांसाहाराच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर चिकन प्रति किलो 180 रुपयांना मिळणार आहे.
विरार पूर्व भागातील साईनाथ नगर येथील शिवसैनिकांनी अल्प दरात एक किलो चिकन विक्रीची घोषणा केली आहे. सध्या चिकनचे दर प्रति किलो 230 ते 240 रुपयांवर पोहोचले आहेत. श्रावण अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे अनेकांना गटारीचे वेध लागले आहेत. त्यामुळे मांसाहाराच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांनी हेच चिकन प्रति किलो 180 रुपयांना देणार, असे फलक लावून जाहिरात केली आहे. प्रत्येकाला एकच किलो चिकन मिळेल.
रविवारी गटारी अमावस्या आहे. तळीरामांसोबतच मांसाहारी खवय्यांचे डोळेही या दिवसाकडे लागलेले असतात. तीच संधी साधून शिवसैनिकांनी ही शक्कल लढवली असल्याचे समोर आले आहे. रविवारी 8 ऑगस्टला विरार पूर्व साईनाथ नगर नाका येथे सकाळी 9 ते 11 या वेळेत हे चिकन विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आगाऊ नोंदणी करावी लागणार आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Virar Shivsena offer chicken in low rate on occasion of Gatari Amavasya news updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Samsung Galaxy Smartphone | सॅमसंग गॅलेक्सीच्या 'या' सिरीजवर मिळतेय 12,000 रुपयांची सूट, संपूर्ण डिटेल्स इथे जाणून घ्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL
- Smart Investment | स्मार्ट गुंतवणुकीचा हा फॉर्म्युला तुम्हाला 2 कोटी रुपये परतावा देईल, समजून घ्या आणि श्रीमंत व्हा
- LPG Gas New Connection | एलपीजी गॅस कनेक्शन योजनेसह मिळेल 450 रुपयांच्या गॅस सिलेंडरचं कनेक्शन, कसा अप्लाय करा
- Property Knowledge | वडिलांच्या संपत्तीवर किती कालावधीत हक्क सांगू शकता; वेळ निघून गेल्यानंतर कोर्टही काही करू शकणार नाही
- RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या स्पीडने कमाई होणार, मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
- RVNL Share Price | RVNL आणि Just Dial शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, मिळेल 190% परतावा - NSE: RVNL
- Life Insurance Policy | लाईफ इन्शुरन्सचे एकूण प्रकार किती; तसेच जनरल आणि लाइफ इन्शुरन्समधील नेमका फरक काय लक्षात ठेवा
- BEL Vs Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 45% पर्यंत मिळेल परतावा - NSE: TATAMOTORS
- EPF Withdrawal | पगारदारांनो EPF च्या पैशांतून होम लोन फेडत आहात का; तुम्ही जे करताय ते योग्य आहे की अयोग्य, इथे जाणून घ्या