28 January 2025 7:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

बविआ'चे उमेदवार बळीराम जाधव आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्छाडो यांच्या भेटीला

MLA Hitendra Thakur, MLA Kshitij Thakur, BVP

पालघर : सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने पालघर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यानिमित्ताने बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्छाडो यांची सदीच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर देखील उपस्थित होते.

युतीचे उमेदवार केवळ हिंदुत्वाच्या अजेंड्यावर निवडणूक लढवत असले तरी त्यांना पालघर पट्ट्यातील बहुसंख्य हिंदू समाजाचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. तर दुसरीकडे बहुजन विकास आघाडीला सर्व धर्मियांचा पाठिंबा मिळताना दिसत आहे. तसेच समस्थ भारतात केवळ हिंदुत्वाच्या अजेंड्यावर लोकसभा लढवणाऱ्या भाजप-शिवसेनेवर इतर धर्मियांचा प्रचंड रोष असल्याचं पाहायला मिळत आहे.

सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त आमदार हितेंद्र ठाकूर यांनी चावडी सभांवर अधिक भर दिला आहे. बहुजन विकास आघाडीचा येथे मोठ्या प्रमाणावर पारंपरिक मतदार आहे. त्यात पालघर जिल्ह्यात चांगली ताकद असलेल्या माकपने यंदा उमेदवार न देता बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार आणि विक्रमगड तालुक्यांमध्ये माकपची मोठी राजकीय ताकद असल्याने त्याचा थेट फायदा बहुजन विकास आघाडीला होणार यात शंका नाही.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x