18 November 2024 5:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

लज्जास्पद! दागिने चोरी प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री निशिथ प्रमाणिक यांच्याविरोधात कोर्टाचं अटक वॉरंट

Union minister Pramanik

Union Minister Pramanik | पश्चिम बंगालच्या अलिपुरद्वार येथील न्यायालयाने केंद्रीय गृहराज्यमंत्री निशिथ प्रमाणिक यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. १३ वर्षांपूर्वी दोन दागिन्यांच्या दुकानात झालेल्या चोरीच्या प्रकरणात कोर्टाने हा आदेश दिला आहे. या खटल्याची सुनावणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरू आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री निशिथ प्रमाणिक हे या 13 वर्ष जुन्या चोरीच्या गुन्ह्यांत आरोपी आहेत.

न्यायालयात हजर न राहिल्यामुळे वॉरंट जारी
या खटल्याच्या सुनावणीवेळी केंद्रीय मंत्री ना स्वतः हजर होते, ना त्यांची बाजू मांडण्यासाठी वकीलही नव्हते, त्यानंतर न्यायालयाने केंद्रीय मंत्र्यासह अन्य एका आरोपीविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. या वॉरंटनंतर केंद्रीय मंत्र्यांनी कोणती कायदेशीर पावले उचलावीत, याबाबत कोणतीही माहिती देण्यास प्रमानिकचे वकील दुलाल घोष यांनी नकार दिला.

कोलकत्ता हायकोर्टाच्या आदेशानंतर चोरीचा खटला
सरकारी वकील जेहर मजुमदार यांनी सांगितले की, कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर चोरीचा खटला उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील विशेष खासदार/ आमदार न्यायालयातून अलीपूरद्वार न्यायालयात वर्ग करण्यात आला.

केंद्रीय मंत्री हे उत्तर बंगालमधील बांगलादेश सीमेजवळील दिनहाटा शहरातील रहिवासी आहेत. 2019 ची लोकसभा जिंकून प्रमणिक पहिल्यांदाच संसदेत पोहोचला आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी, ते टीएमसीमध्ये होते, जिथे पक्षविरोधी कारवायांसाठी त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते.

नेमकं प्रकरण काय आहे
२००९ मध्ये अलीपूरद्वार रेल्वे स्टेशन आणि बिरपारा जवळील दागिन्यांच्या दुकानांमध्ये चोरी झाली होती, ज्यात केंद्रीय मंत्री आणि इतरांची नावे आरोपी म्हणून ठेवण्यात आली होती. या प्रकरणातील इतर आरोपींनी जामीन अर्ज दाखल केले आहेत, मात्र प्रमणिक यांनी असे कोणतेही पाऊल उचलले नाही. एका दागिन्यांच्या दुकानाची तोडफोड आणि लूट केल्याचा आरोप प्रामाणिकवर आहे. या प्रकरणात प्रमणिक ठरलेल्या तारखेला न्यायालयात हजर न राहिल्याने कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Arrest warrant issued against union minister Pramanik by West Bengal court in jewelry theft case check details on 16 November 2022.

हॅशटॅग्स

#Union minister Pramanik(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x