14 November 2024 11:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

देवेंद्रजी सुधांशू त्रिवेदींची अशी पाठराखण का करताय? चुकीच्या विधानाचं समर्थन करू नका, संभाजीराजे संतापले

Chhatrapati Sambhajiraje

Chhatrapati Sambhajiraje | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्याविरोधातील वातावरण तापलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून महाराष्ट्राच्या विविध भागात राज्यपाल कोश्यारी आणि त्रिवेंदींविरोधात आंदोलन केलं जातं आहे. या वादावर उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ७१ व्या ऑल इंडिया पोलीस रेसलिंग क्लस्टर चॅम्पियनशिपचा समारोप कार्यक्रम काल पुण्यात पार पडला. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
फडणवीस म्हणाले, “एक गोष्ट स्पष्ट आहे, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य पृथ्वीवर आहेत. तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे, देशाचे आणि आपल्या सर्वांचे आदर्श राहतील. आजच्या भाषेत छत्रपती शिवाजी महाराजांचे नायक आहेत. याबद्दल कोणालाही शंका नाही. राज्यपालांच्या मनात शंका नाही.

राज्यपालांच्या शब्दांचा वेगळा अर्थ लावला गेला. मला वाटतं, त्यांच्या मनात अशा कोणत्याही भावना नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय देशात आणि महाराष्ट्रात दुसरा आदर्श असूच शकत नाही, असेही ते म्हणाले. सुधांशू त्रिवेदी यांनीही एक वक्तव्य केलं असून त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावर ते म्हणाले की, सुधांशु त्रिवेदी यांना मी चांगलेच ऐकले आहे आणि कोणत्याही वक्तव्यात महाराजांनी माफी मागितली असे म्हटले नाही.

छत्रपती संभाजीराजे यांचं फडणवीसांना आवाहन
शिवरायांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांनीही सुधांशू त्रिवेदी यांच्या विधानाचा निषेध केलाय. तसंच देवेंद्र फडणवीस यांनाही त्यांनी एक आवाहन केलंय. देवेंद्र फडणवीस अभ्यासू माणूस आहेत. त्यांनी अशा चुकीच्या विधानाचं समर्थन करू नका.सुधांशू त्रिवेदी यांना माफी मागण्यासाठी भाग पाडा, संभाजीराजे म्हणालेत. रात्री एक वाजता मी देवेंद्रजीची प्रतिक्रिया पाहिली. अशी वक्तव्य करणाऱ्या माणसाची पाठ राखण करणं हे अयोग्य आहे, असंही संभाजी राजे म्हणालेत. देवेंद्रजी अशी पाठराखण का करताय असा मला प्रश्न पडलाय. वेळप्रसंगी मी देवेंद्रजींना याबाबत विचारणारही आहे, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Chhatrapati Sambhajiraje warned DCM Devendra Fadnavis over Sudhanshu Trivedi statement check details on 21 November 2022.

हॅशटॅग्स

#Chhatrapati Sambhajiraje(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x