16 April 2025 10:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

मतदार रोजगार, महागाईवर बोलू लागताच शहांकडून सभांमध्ये गुजरात दंगलीची आठवण, म्हणाले.. असा धडा शिकवला की..

Gujarat Assembly Election 2022

Gujarat Assembly Election 2022 | भाजप सरकारांनी राज्यात अखंड शांतता प्रस्थापित केली आहे, असा दावा करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमधील निवडणूक प्रचारसभेत 20 वर्ष जुन्या जातीय दंगलीची आठवण करून दिली आहे. गुजरातच्या खेडा जिल्ह्यातील निवडणूक प्रचारसभेत शुक्रवारी अमित शहा म्हणाले की, “काँग्रेसने ही सवय बिघडवली होती, त्यामुळे 2002 मध्ये दंगली झाल्या होत्या, पण 2002 मध्ये असा धडा शिकवला गेला की 2002 ते 2022 पर्यंत पुन्हा कुणाची हिंमत झाली नाही. गुजरातमधील जातीय दंगलखोरांविरोधात कठोर पावले उचलून राज्यातील भाजप सरकारांनी गुजरातमध्ये अखंड शांतता प्रस्थापित केली आहे.”

गुजरात भाजपनेही आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून अमित शाह यांच्या भाषणाचा काही भाग शेअर केला आहे, ज्यात त्यांनी गुजरात दंगलीचा उल्लेख केला आहे. गुजराती भाषेत दिलेल्या भाषणाच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये गृहमंत्री अमित शहा बरोबर 1 मिनिटानंतर हसत आहेत आणि 2002 मध्ये धडा शिकवण्याबद्दल बोलत आहेत.

काँग्रेस लोकांना दंगलीसाठी भडकवत असे : अमित शहा
“काँग्रेसच्या राजवटीत गुजरातमध्ये जातीय दंगली सामान्य होत्या,” असे गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ खेडा जिल्ह्यातील महुधा येथे झालेल्या निवडणूक सभेत सांगितले. काँग्रेस वेगवेगळ्या वर्गातील आणि जातीधर्मातील लोकांना एकमेकांविरोधात लढण्यासाठी भडकवत असे. काँग्रेस या दंगलींच्या माध्यमातून आपली व्होट बँक मजबूत करत असे आणि समाजातील एका मोठ्या वर्गावर अन्याय होत असे.

न्युज एजन्सीच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे दंगलखोरांना हिंसेची सवय झाल्यामुळे २००२ मध्ये गुजरातमध्ये दंगली झाल्या, मात्र २००२ मध्ये त्यांना असा धडा शिकवण्यात आला की या घटकांनी हिंसेचा मार्ग सोडला. यानंतर 2002 ते 2022 पर्यंत त्यांनी हिंसा केली नाही आणि जातीय दंगली घडवणाऱ्यांविरोधात कठोर पावलं उचलत भाजपने गुजरातमध्ये कायमची शांतता प्रस्थापित केली, असं ते म्हणाले. गुजरातमध्ये फेब्रुवारी २००२ मध्ये गोध्रा येथे रेल्वेच्या डब्याला आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्या होत्या, ज्यात मोठ्या प्रमाणात लोक मारले गेले होते. अमित शहा यांनी खेरा येथील भाषणात जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचाही उल्लेख केला. याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि काँग्रेसने आपल्या व्होट बँकेमुळे तसे केले नाही, असे सांगितले.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gujarat Assembly Election 2022 Amit Shah reminds voters of Gujarat riots says they were taught a lesson in 2002 check details on 26 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gujarat Assembly Election 2022(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या