गुजरात निवडणुकीत भाजपला फक्त 50 जागा मिळण्याचा स्थानिक पत्रकारांचा अंदाज, तर भाजप नेत्यांचे रेकॉर्ड तोडण्याचे भाकीत

Gujarat Assembly Election 2022 | पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप) विजयी होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी व्यक्त केला. भाजप सर्व रेकॉर्ड तोडून गुजरातमध्ये बहुमताने सरकार स्थापन करेल, असा दावा शहा यांनी केला. सध्या भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे कौतुक करत राज्याचे भवितव्य बदलले आहे, असे म्हटले आहे.
दुसऱ्या, बाजूला स्थानिक पत्रकार देतं असलेल्या वृत्तानुसार गुजरातमध्ये भाजपाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. अनेक स्थानिक पत्रकारांनी भाजप ४०-५० जागांवर अडकेल असं भाकीत नोंदवलं आहे. विशेष म्हणजे निवडणुकीत महागाई, बेरोजगारी आणि प्रशासनातील भ्रष्टाचार हे प्रमुख मुद्दे झाल्याने आणि त्यात हिंदू-मुस्लिम मुद्यांना मतदार भीक घालत नसल्याने मोदी-शहांसहित भाजपाची मोठी कोंडी झाल्याचं वृत्त आहे. अनेक मतदारसंघात भाजपच्या बंडखोरांनी भाजपाची पंगा घेतल्याने स्वतः अमित शहांवर त्यांना भेटून विनंती करण्याची वेळ आली आहे. धामिर्क मुद्दे उफाळत नसल्याने गुजरात निवडणुकीत भाजपची अडचण वाढली असून त्यासाठीच खोटे सर्व्ह प्रसिद्ध करण्याचा सपाटा सुरु झाल्याचं स्थानिक पत्रकार सांगत आहेत. स्वतः पंतप्रधान आणि अमित शहांना गुजरातमध्ये ठाण मांडून बसण्याची वेळ ओढवली आहे. पराभव दिसू लागल्याने मोदी सुद्धा भाषणात विरोधक मला शिव्या देतं आहेत असं ओरडून ओरडून सांगण्याची वेळ आली आहे. मात्र मतदारांसाठी हे रोजचं झाल्याने ते या निवडणुकीत भाजपाला मतदान करण्याच्या मनस्थितीत नसल्याचं पाहायला मिळतंय. स्थानिक आमदारांवर रोष असल्यानेच भाजपने मोठ्या प्रमाणावर नवे उमेदवार दिल्याचं म्हटलं जातंय. आयत्यावेळी मोदींसाठी एका कंटेनरमध्ये शाळा थाटून गुजरातच्या शैक्षणिक मॉडेलचा इव्हेन्ट करण्यात आला, मात्र त्याचीही स्थानिक पत्रकारांनी पोलखोल करून व्हिडिओ व्हायरल केल्याने भाजपचा पाय अजून खोलात गेला आहे असं स्थानिक पत्रकार सांगत आहेत. हिमाचल निवडणुकीचा निकालही भाजपच्या विरोधात असल्याचं म्हटलं जातंय. परिणामी, त्याची मतमोजणी १ महिन्याने होणार आहे, कारण त्यामुळे गुजरातमध्ये परिस्थिती अजून बिकट होईल अशी चर्चा पत्रकारांमध्ये आणि त्यांच्या युट्युब वाहिन्यांवर सुरु झाली आहे.
सानंद विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कनुभाई पटेल हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांकडे गेले असता शहा त्यांच्यासोबत होते. पटेल कोळी समाजाचे असून ते साणंदचे विद्यमान आमदार आहेत. शहा यांच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघात साणंद येतात. ‘गुजरात भाजप या विधानसभा निवडणुकीत याआधीचे सर्व विक्रम मोडणार आहे. आतापर्यंतच्या सर्वाधिक जागा जिंकून आणि आतापर्यंतची सर्वाधिक मते मिळवून भाजप पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने येथे सरकार स्थापन करेल, असा विश्वास शहा यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राज्यात अनेक विकासकामे केली आहेत. कायदा व सुव्यवस्था मजबूत झाली असून त्यांनी (मुख्यमंत्री पटेल) अर्थव्यवस्थेला चालना दिली असून आरोग्य, शिक्षण आणि विविध क्षेत्रांत सुधारणा केली आहे. दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गाच्या सर्वांगीण विकासासाठी मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना विकसित केलेले मॉडेल भूपेंद्र पटेल यांनी पुढे नेले, असे शहा म्हणाले.
निवडणूक 1 आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात
182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेची निवडणूक 1 आणि 5 डिसेंबर रोजी दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 89 तर दुसऱ्या टप्प्यात साणंदसह 93 जागांवर मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर आहे. भाजपने विद्यमान आमदार कनुभाई पटेल यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर पक्षाचे स्थानिक नेते आणि सानंद कृषी उपज मंडी समितीचे (एपीएमसी) अध्यक्ष खेंगर पटेल यांना तिकीट मिळेल या आशेवर असलेले खेंगर पटेल यांनी कनुभाई पटेल यांच्याविरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची घोषणा केली. मात्र, शहा यांची भेट घेतल्यानंतर खेंगर पटेल यांनी निवडणूक लढवण्याची योजना सोडून दिली आणि कनुभाई पटेल हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले असता त्यांच्यासोबतही गेले होते.
बंडखोर खेंगरभाई यांच्याकडे विनंतीचा सपाटा :
एपीएमसीचे अध्यक्ष खेंगरभाई यांनी यापूर्वी निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली होती, परंतु आम्हाला आनंद आहे की त्यांनी भाजपच्या आवाहनाचा आदर केला आणि आपली योजना रद्द केली,” असं शाह म्हणाले. त्यांनी कनुभाईंना पाठिंबा दिला आहे. गेल्या निवडणुकीपेक्षा भाजप या जागेवर मोठ्या फरकाने विजय मिळवेल, असा मला विश्वास आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Gujarat Assembly Election 2022 BJP leaders statement on record breaking check details on 15 November 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर 71 रुपयांची टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक रेटिंग अपडेट, फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स डिफेन्स शेअर फोकसमध्ये, पुढे तेजी की मंदी येणार – NSE: BEL
-
RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 5 टक्क्यांनी घसरला, घसरणीचे वादळ येणार की पुन्हा तेजी येणार – NSE: RVNL
-
Tata Steel Share Price | 131 रुपयांचा टाटा स्टील शेअर 190 रुपये टार्गेट प्राईस गाठणार, स्टॉक आजही तेजीत – NSE: TATASTEEL
-
Post Office GDS Recruitment | महाराष्ट्र सहित ग्रामीण टपाल सेवेक पदाच्या 21,413 जागांसाठी भरती, महिना 29,380 रुपये पगार
-
NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, फायद्याचे संकेत - NSE: NHPC
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांकडून मोठे संकेत, टॉप ब्रोकरेज बुलिश - NSE: RELIANCE
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्समध्ये सातत्याने घसरण सुरू, गुंतवणूकदार संभ्रमात – NSE: RELIANCE
-
Zomato Share Price | मजबूत कमाईचे संकेत, 214 रुपयांचा झोमॅटो शेअर 400 रुपयांची पातळी गाठणार – NSE: ZOMATO
-
Post Office Scheme | मुद्दलापेक्षा जास्त व्याज मिळणार या पोस्ट ऑफिस योजनेत, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळेल