22 January 2025 3:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई
x

सुप्रीम कोर्टात 29 नोव्हेंबरला सुनावणी, तर शिंदे गट 2 दिवस आधी गुवाहाटीला, राजकीय भूकंपाचे संकेत? मोठी बातमी

Maharashtra Political Crisis

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगासंदर्भात शिवसेनेच्या दोन्ही गटांनी अनुक्रमे उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी २९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने वकिलांना या खटल्याचे लेखी स्वरूपात संकलन पूर्ण करण्यास सांगितले आणि चार आठवड्यांत मुख्य मुद्दे विचारात घेऊन ते लेखी स्वरूपात देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर सर्वाधिक धाकधूक शिंदे गटाची झाल्याची बातमी आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगासंदर्भात शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटांनी दाखल केलेल्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक केंद्रित असलेली असलेली १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका चर्चेचा विषय बनली आहे. त्याच मुख्य कारण असं म्हटलं जातंय की त्यात घटनेतील तरतुदींवर जोर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुख्य न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड हे घटनात्मक विषयांबाबत अत्यंत कठोर निर्णय घेण्यात सर्वश्रुत असल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिका महत्वाची यासाठी आहे कारण त्यात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील आहेत. हा निर्णय शिंदे सरकारच्या विरोधात गेल्यास काय यावर अंदाज व्यक्त करून त्यासंबधित राजकीय हालचाली आणि अप्रत्यक्ष राजकीय टिपण्या सुरु झाल्या आहेत.

२९ नोव्हेंबरला सुनावणी आणि त्यापूर्वीच शिंदे गट गुवाहाटीला का?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या 50 आमदारांसह पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार आहेत असं वृत्त आहे. 26 आणि 27 नोव्हेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहेत. मात्र तिकडे गेल्यावर दौरा पुन्हा वाढवला जाणार का? म्हणजे २९ नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार आहे आणि त्यात शिंदे गटाविरोधात काही निर्णय आल्यास इतर आमदार फुटू नयेत यासाठी भाजप विशेष काळजी घेत असल्याची राजकीय चर्चा सुरु झाली आहे. त्यात सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही बाजूने राज्यात मध्यावधी निवडणुकाचे दावे सुरु झाल्याने याविषयावर चर्चा जोर धरू लागली आहे.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे अप्रत्यक्ष संकेत?
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे कन्नड तालुक्यातील सिरजगाव येथे एका कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना रावसाहेब दानवेंनी मोठं विधान केलं. “पूर्वी राजा पोटातून जन्माला यायचा. आता मतपेटीतून राजा निवडला जातो. राजकारणात तुमच्या अंगात किती सोने असेल, पण तुमच्यासोबत लोक नसतील तर तुम्हाला काहीच किंमत नाही. यासाठी राजकारण करायचे असेल तर तुमच्यासोबत लोक असली पाहिजेत”, असं दानवे म्हणाले.

पुढे बोलताना दानवे म्हणाले, “महाविकास आघाडीचं सरकार जाईल असं कुणालाही वाटत नव्हतं. मात्र, अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळलं. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही. सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामे करा”, असं रावसाहेब दानवे म्हणाले आहेत.

संजय राऊत काय म्हणाले?
शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, रावसाहेब दानवे कधी कधी खरं बोलून दाखवतात. दोन महिन्यानंतर काहीही होऊ शकतं. म्हणजे सरकार पडू शकतं म्हणजेच त्यांनी मध्यवधीचे संकेत दिले आहेत. हे सरकार 100 टक्के पडतंय, याविषयी माझ्याकडे पूर्ण माहिती आणि खात्री आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Political Crisis before Supreme Court hearing check details on 22 November 2022.

हॅशटॅग्स

#Maharashtra Political Crisis(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x