15 January 2025 1:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा
x

राज ठाकरेंनी सुद्धा शिंदे गटातील आमदारांप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या आजाराची खिल्ली उडवली, भाषणात केली नक्कल

Raj Thackeray

MNS Chief Raj Thackeray | गोरेगाव येथील नेस्को मैदनात आयोजित मनसे गटाध्यक्ष मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनेक मुद्यांना हात घातला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. कुणाला, मान्यता मिळणार कुणाला नाही मिळणार? चिन्ह कुणाला मिळणार? याबाबत त्यांच त्यांना डोकं खाजवू द्या. असं म्हणत राज ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली.

यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंच्या आजाराची खिल्ली उडवल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असताना तब्येतीचं कारण सांगून… असं सांगताना त्यांनी यावेळी ऍक्टिंगही करून दाखवली. पुढे म्हणाले की, मग एकनाथ शिंदे यांनी रात्री कांडी फिरविली. आता फिरतात सगळीकडे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा नि फिरायचं हे मी करत नाही. उद्धव ठाकरे यांच्या अंगावर एकतरी केस आहे का. भूमिका घ्यायची नाही. फक्त पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, अशी टीका राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. विशेष म्हणजे काही महिन्यांपासून राज ठाकरे देखील एका ऑपरेशमुळे दौरे करू शकले नव्हते आणि त्यावेळी त्यांना आपल्या आजारपणाची कारणं देताना सर्वानी पाहिलं आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर राज ठाकरेंविरोधात तिखट प्रतिक्रिया उमटत आहेत.

मराठी किंवा हिंदुत्वाच्या मुद्यावर उद्धव ठाकरेंवर एकतरी गुन्हा दाखल आहे का? त्यांनी कधी भूमिकाच घेतली नाही, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही. फक्त स्वार्थासाठी आणि पैशांसाठी सगळ्या गोष्टी करायच्या. कधी हा तर कधी तो… असं करत सत्तेत बसायचं. पाकिस्तानी कलाकार जेव्हा भारतात धुडगूस घालत होते, तेव्हा त्यांच्या पार्श्वभागावर लाथ मारून मनसेनं त्यांना हाकलून दिलं होतं. तेव्हा हे हिंदुत्ववादी कुठे होते. आता ते म्हणतात राज ठाकरे हिंदुत्ववादी झाले. पण मी आधीपासूनच हिंदुत्ववादी आहे. एका हिंदुत्ववादी आणि कट्टर मराठी घरात माझा जन्म झाला आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MNS Chief Raj Thackeray target Uddhav Thackeray check details on 27 November 2022.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x