21 April 2025 3:33 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत, मल्टिबॅगर इरेडा शेअर देईल मजबूत परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: IREDA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 21 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEL Share Price | बापरे, तब्बल 1,33,786% परतावा दिला या शेअरने, पुन्हा तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर ऑटो कंपनीचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट जाहीर - NSE: ASHOKLEY Vodafone Idea Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँकेच्या नफ्यात प्रचंड वाढ, पण तज्ज्ञांनी पेनी स्टॉकबद्दल काय म्हटलं? टार्गेट जाणून घ्या - NSE: YESBANK Vedanta Share Price | या शेअरला मोठा भविष्यकाळ, खरेदी करून ठेवा, अनेक तज्ज्ञांनी दिला सल्ला - NSE: VEDL
x

राजकारणात आपला शत्रू तुरुंगात जावा अशी कुणाचीही भावना असू नये, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

MP Sanjay Raut

MP Sanjay Raut | आज तीन महिन्यांनी मी हातात घड्याळ घातलं आहे. तुरुंगात राहणं ही काही चांगली बाब नाही. जगातलं कुठलंही जेल चांगलं असेल असं कुणाला वाटत असेल तर तसं ते नाही. ते खूप कठीण असतं. आता मी बाहेर आलो आहे माझं स्वागत झालं. मला तीन महिन्यांनी लोक विसरतील असं वाटलं होतं. पण तसं काहीही झालेलं नाही. मी आज आमचे नेते उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार आहे. आज शरद पवारांनीही माझ्याशी फोनवरून संवाद साधला असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. १०३ दिवसांनी आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

कोर्टाच्या ऑर्डरमुळे चांगला संदेश
कोर्टाने जी ऑर्डर माझ्या जामिनाबाबत दिली त्यामुळे देशात एक चांगला मेसेज गेला आहे. ज्यांनी हा कट रचला होता त्यांना आनंद झाला असेल तर ठीक आहे. माझ्या मनात कुणाविषयीही तक्रार नाही. माझ्या कुटुंबाने अनेक गोष्टी सहन केल्या. मात्र राजकारणात अशा गोष्टी घडतात. मात्र अशा प्रकारचं राजकारण कधीही देशानं पाहिलं नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. राजकीय शत्रू असतील तरीही चांगलं वागण्याची आपल्याकडे परंपरा आहे. ठीक आहे जे झालं ते झालं असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. संजय राऊत यांनी म्हटलं की,… राज ठाकरेंनी एका भाषणात टीका करताना सांगितलं होतं की ‘राऊतांना अटक होईल. त्यांनी एकांतात स्वतःशीच बोलण्याची प्रॅक्टीस करावी.’ मला त्यांचा सांगायचंय की राजकारणात आपला शत्रू तुरुंगात जावा अशी कुणाचीही भावना असू नये!

यावेळी संजय राऊत यांनी वीर सावरकर यांचाही उल्लेख केला. सावकरांपासून आणीबाणीचे अनेक नेते तुरुंगात होते. माझी अटक बेकायदेाशीर होती, असं कोर्टानं म्हटलंय. तुरुंगातील अनुभव सांगण्यासारखा नाही. पण एकांताचा हा काळ सत्करणी लावल्याचंही राऊतांनी यावेळी नमूद केलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: MP Sanjay Raut slams MNS chief Raj Thackeray check details here 10 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#MP Sanjay Raut(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या