14 November 2024 11:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

शिंदे गटाचा भाजपच्या हिंदुत्वावरच संशय? भाजप आमदार प्रसाद लाड यांचा जन्म पाकिस्तानात झालाय काय? अशी प्रतिक्रिया

Shinde Camp

Shinde Camp MLA Sanjay Gaikawad | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानांमुळे निर्माण झालेलं वादंग अद्यापही संपलेलं नाही. त्यातच आता भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाबद्दल चुकीचं विधान केलं आहे. लाड यांच्या या विधानामुळे संपूर्ण वादाला खतपाणी मिळाल्याचंच दिसत असून विरोधकांनी यावरून भाजपची कोंडी केली आहे.

प्रसाद लाड काय म्हणाले?
स्वराज्यभूमी कोकण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उत्सवाच्या आयोजनाची माहिती भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी दिली. यावेळी प्रविण दरेकरही उपस्थित होते. प्रसाद लाड म्हणाले, “स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी, असं तु्म्ही विचाराल, तर हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. संपूर्ण भारताचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात हा झाला”, असं विधान प्रसाद लाड यांनी केलं. प्रसाद लाड पुढे म्हणाले, “रायगडावर त्यांचं बालपण गेलं. रायगडावर त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली. त्यामुळे ती सुरूवात कोकणातून झाली”, असं प्रसाद लाड यांनी सांगितलं.

प्रसाद लाड यांच्या या विधानाचा फक्त विरोधकच नाही तर शिंदे गटाच्या आमदारांनीही चांगलाच समाचार घेतला आहे. गुलाबराव पाटील यांच्यानंतर आता संजय गायकवाड यांनीही प्रसाद लाड यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रसाद लाड यांचा जन्म पाकिस्तानात झाला का? हे तपासावं लागेल, असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला. तसेच राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील हेदेखील या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. पद गेलं खड्ड्यात, पण शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास ऐकून घेतला जाणार नाही, असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shinde Camp MLA Sanjay Gaikawad angry on BJP MLA Prasad Lad check details on 05 December 2022.

हॅशटॅग्स

#Shinde Camp(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x