15 January 2025 1:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा
x

वीर सावरकरांबाबत आमच्या मनात नितांत आदर, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसणाऱ्या मातृसंस्थेच्या पिल्लांनी सावरकरांवर बोलू नये

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray | स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी आमच्या मनात नितांत आदर आणि प्रेम आहे. त्यांच्याविषयी आम्हाला कुणीही शिकवायची गरज नाही. ज्या लोकांची मातृसंस्था स्वातंत्र्य लढ्यात सहभागीही झाली नव्हती त्यांनी आम्हाला वीर सावरकरांबाबत काहीही शिकवायाची गरज नाही असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले
वीर सावरकरांचा अपमान झाल्यानंतर तो मुद्दा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला याचा मला आनंद वाटतो. आदरणीय वीर सावरकर यांच्याबाबत आमच्या मनात अत्यंत आदर आणि श्रद्धा आहेच. ती कुणीही पुसायचं ठरवलं तरीही ती पुसता येणार नाही. स्वातंत्र्यवीराबाबत ते प्रश्न विचारत आहेत ज्यांच्या मातृसंस्थेच्या मुलांचा किंवा पिल्लांचा स्वातंत्र्यांशी काहीही संबंध नाही. स्वातंत्र्यवीरांबाबत असं प्रेम व्यक्त करणं हे हास्यास्पद आहे. RSS स्वातंत्र्य लढ्यापासून लांब होते. त्यामुळे त्यांनी याबाबत बोलू नये.

आम्ही एकत्र आलो आहोत कारण
स्वातंत्र्यवीरांनी ज्या स्वातंत्र्यासाठी त्याग केला ते स्वातंत्र्यच आज धोक्यात आलं आहे. त्यातून बाहेर पडण्याच्या महत्त्वाच्या उद्देशाने आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळे हा बाष्कळपणा त्यांनी बंद करावा आणि आधी स्वातंत्र्यलढ्यात आधी आपल्या मातृसंस्थेचं योगदान काय ते सांगावं

संजय राऊत सुद्धा आक्रमक
वीर सावरकर यांच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीवर टीका केली होती. त्या टीकेला आज संजय राऊत यांनी जशास तसं उत्तर दिलं. तसंच एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

भारतरत्नची मागणी
वीर सावरकर यांच्याबाबत ढोंगी प्रेम दाखवू नका त्यांना भारतरत्न ही मागणी आम्ही सातत्याने करत आहोत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून आम्ही वीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे अशी मागणी करत आहोत. त्यांना भारतरत्न पुरस्कार का दिला जात नाही? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला आहे. वीर सावरकर हिंदूहृदय सम्राट होते, त्यांच्या नंतर बाळासाहेब ठाकरे हेच हिंदूहृदयसम्राट असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेब आज असते तर
बाळासाहेब आज जर असते आणि ज्यांनी कमरेखाली घाव घातले असते, त्यांची अवस्था आज फार वाईट करून सोडली असती. त्यांच्याकडे फटकारे होते, ज्या भूमिका आणि विचार होते, त्यामुळे महाराष्ट्र भक्कम झाला. ते हिमालयापेक्षा मोठे होते. आज त्या तोडीचे नेतृत्व राज्यात नाही. आजही बाळासाहेबांच्या नावाने जे तोतये निर्माण झाले आहे, ते फार काळ टिकणार नाही’, असं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Uddhav Thackeray talked on Veer Savarkar check details on 17 November 2022.

हॅशटॅग्स

Uddhav Thackeray(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x