17 April 2025 3:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Viral Video | 10 वर्षांच्या मुलीने उचलले 102.5 किलो वजन, ताकद पाहून यूजर्स दंग, पहा व्हिडीओ

10 Years Old Girl Lifts 102 Kg Weight

10 Years Old Girl Lifts 102 Kg Weight  | ‘जिद्द’ या शब्दामध्येच खूप मोठी ताकद आहे, नाही का. आपल्या आजूबाजूला बरेच असे लोक आहेत जे स्वप्न पुर्ण करण्यासाठी दिवस रात्र एक करून कष्ट करत असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही थक्क व्हाल. 10 वर्षांची मुलगी सध्या सर्वंत्र गाजत आहे, याचे कारण म्हणजे की, अवघ्या 10 वर्षांच्या या मुलीने 102 किलो वजन उचलले आहे. सर्व जण आश्चर्यचकित होत आहेत की, या मुलीमध्ये एवढी ताकद कशी? अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणंही कठीण होतं आहे तर चला जाणून घेऊयात हे संपूर्ण प्रकरण?

10 वर्षांच्या मुलीने उचलले 102.5 किलो वजन
गुजरात स्टेट पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये 10 वर्षांच्या मुलीने असे काही करून दाखवले आहे की सर्वांनाच धक्का बसला आहे. कनक इंदर सिंग गुर्जर नावाच्या या मुलीने आपल्या 10 वर्षांच्या काळामध्ये तब्बल 102.5 किलो वजन उचलले तेव्हा तिच्या वडिलांचाही विश्वास बसेना तर त्याचे कारण, कनकचे वडील इंदर सिंग गुर्जर आणि आई धारिणी गुर्जर हे दोघेही वेट लिफ्टर आहेत. तसेच या दोघांनी देश-विदेशातील स्पर्धांमध्ये खूप नाव कमावले आहे मात्र मोठी गोष्ट म्हणजे कनकने ना सराव केला होता ना तिला वेट लिफ्टरसाठी कोणतेही प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यामुळे कनकने असा पराक्रम करून सर्वांनाच चकित केले आहे.

कनकचे अप्रतिम साहस
कनकचे वडील इंदर सिंग म्हणत होते की, मोठ्या मुलींना चॅम्पियनशिपमध्ये वजन उचलताना पाहून तिनेही ठरवले आणि प्रयत्न करण्याचा विचार केला. कनक या प्रयत्नात पुर्णपणे यशस्वी झाली यामध्ये दुमत नाही. आता याच प्रयत्नातून कनकची फ्लोरिडा, यूएसए येथे होणाऱ्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2022-23 साठी निवड झाल्याचे समोर येत आहे. तसेच कनकचे वडील इंदर सिंग यांनी डिसेंबर 2021 मध्ये 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते आणि आता देशभरात कनकची चर्चा होत असून लोकही आश्चर्य व्यक्त करत आहेत आणि तिच्या ताकदीचे कौतुक करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: 10 Years Old Girl Lifts 102 Kg Weight Video Viral Checks details 15 October 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

10 Years Old Girl Lifts 102 Kg Weight(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या