22 January 2025 10:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो SBI Mutual Fund | नोकरदारांनो बँक FD विसरा, 'या' म्युच्युअल फंड योजना 31 टक्केपर्यंत परतावा देत पैशाने पैसा वाढवतील Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, स्टॉक BUY करावा का - NSE: TATASTEEL Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप कंपनीच्या नफ्यात घट, तरीही ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH Penny Stocks | प्राईस 88 पैसे, एका वडापावच्या किंमतीत 20 शेअर्स खरेदी करा, यापूर्वी 633% परतावा दिला - Penny Stocks 2025 Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअरने 1 महिन्यात 53% परतावा दिला, खरेदीची संधी सोडू नका - NSE: APOLLO
x

Viral Video | मुंबईतील हिंदू-मुस्लिम दंगलीत सर्व हिंदू तसेच मराठी माणूस आणि स्वतः चंद्रकांत पाटील सुद्धा शिवसेनेमुळे वाचले, पहा व्हिडिओ

Chandrakant Patil

Minister Chandrakant Patil ​​| मुंबईतल्या नेस्को मैदानावर काल शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी तुफान फटकेबाजी करत भाजप आणि शिंदे गटावर कडाडून टीका केली. एवढंच नाही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही त्यांनी टीका केली. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी नेस्को मैदानात भाषण करत तुफान टीका केली. एवढंच नाही तर ठाकरी शैलीत त्यांनी अमित शाह यांनाही आव्हान दिलं आहे.

शिवसेना संपवण्यासाठी सगळे एकमेकांच्या साथीने उभे राहिले आहेत. भाजपने मुन्नाभाईलाही सोबत घेतलं आहे. या उद्धव ठाकरेच्या विरोधात मोदी, शाह, भाजप आमचे गद्दार आणि मुन्नाभाई सगळे एकत्र आले आहेत. याचं कारण एकच आहे यांना शिवसेना आणि उद्धव ठाकरे तसंच ठाकरे घराणं संपवायचं आहे. मुंबईचा लचका यांना तोडायचा आहे. पण आज माझं या मैदानावरून अमित शाह यांना आव्हान आहे हिंमत असेल तर पुढच्या महिन्याभरात मुंबई महापालिका आणि विधानसभेची निवडणूक घेऊन दाखवा असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना आव्हान दिलं आहे.

महाराष्ट्रातील वातावरण उद्योग-व्यापारासाठी सध्या निकोप नाही. महाराष्ट्राची मोठी गुंतवणूक ‘खोके कंपनी’त झाली. त्या खोक्यांची आता वसुली सुरू झाल्याने उद्योग व गुंतवणूकदारांची पळापळ सुरू आहे. गुजरात म्हणजे पाकिस्तान नाहीच, पण महाराष्ट्राला दुश्मन ठरवले जात आहे. महाराष्ट्राची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान फडणवीस यांच्या समोर आहे. बाकी टक्केवारीचा नवा हिशेब घ्यायला शेलारांचे नियोजन मंडळ आहेच, असा टोलाही सेनेनं शेलारांना लगावला.

दरम्यान, हिंदुत्व आणि मराठी माणूस या विषयावरून सेनेला लक्ष करत असताना दुसऱ्या बाजूला भाजपच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांचे जुने व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होऊ लागल्याने आता भाजपाची खिल्ली उडवली जातं आहे. हा व्हिडिओ आहे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा, ज्यामध्ये ते एका मुलाखतीत स्वतः मुंबईतील अनुभवातून शिवसेनेमुळे येथे हिंदू आणि मराठी माणूस कसा टिकून आहे याचा पाढा वाचताना दिसत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांच्या सोयीस्कर भूमिका सुद्धा समोर येतं आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: BJP Leader Chandrakant Patil interview statement on Shivsena check details 22 September 2022.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x