16 April 2025 7:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL
x

Viral Video | तलावातून बाहेर पडून मगर थेट गावातील शाळेत घुसली, गावकऱ्यांचा जोरदार हल्लाबोल, व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Crocodile Video Viral

Crocodile Video Viral |  माणुस जंगलामध्ये घुसला म्हणून वन्य प्राणी आता घर, शाळा रस्त्यावर दिसून येत आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. रोज सोशल मीडियावर वन्य प्राण्यांशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ शेअर केले जातात. या व्हिडीओमध्ये आपल्याला काही प्राण्यांची रंजक शैली पहायला मिळते तर काही व्हिडीओमध्ये त्यांच्यावर झालेला अत्याचार पहायला मिळतो. सोशल मीडिया या माध्यमातून लोक जागृक होतात, निर्णय घेण्यासाठी सक्षम होतात म्हणायला हरकत नाही. वेळेनुसार काळासोबत सोशल मीडिया आपल्याला घेऊन जात असते. कोणाला शाहणे करते तर कोणाची फजीती.

मगरीचा व्हिडीओ आला समोर
सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की, मगर तलावातून बाहेर पडून गावामध्ये आली आणि ती एका शाळेमध्ये घुसली आहे. जेव्हा गावकऱ्यांना ही गोष्ट समजते तेव्हा सर्व जण त्यामगरीला शाळेतून बाहेर काढतात आणि काठीने मारहाण करण्यास सुरुवात करतात. यावेळी गावातील कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ शूट करून याचा व्हिडीओ बनवला आहे व तो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. जो सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे.

मगरीने शाळेत प्रवेश केला
दरम्यान, हा प्रकार अत्रौलीच्या सिंधोरा कासिमपूर गावातील आहे. अलीगढ गावातील तलावातून मगर बाहेर आली आणि नंतर ती शाळेमध्ये घुसली. शाळेच्या आवारात मगर पाहताच शाळकरी मुलांमध्ये एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांना माहिती मिळताच सर्वजण गोळा झाले आणि त्या मगरीला पकडले. काठ्या घेऊन आलेल्या गावकऱ्यांनी त्या मगरीला बेदम मारल्याचे चित्र आहे. बऱ्याच वेळानंतर ग्रामस्थांनी मगरीला काली नदीत सोडले.

तलावातून दोन मगरी बाहेर आल्या
अलीगढ गावातील तलावातून दोन मगरी बाहेर आल्याचे सांगण्यात येत आहे. एक मगर पुन्हा तलावामध्ये गेली मात्र दुसरी मगर गावकऱ्यांनी पकडली आणि तिला मारहाण करून पुन्हा तलावामध्ये सोडण्यात आले. हे दृश्य आहे अत्रौलीच्या सिंधोरा कासिमपूर येथील प्राथमिक शाळेचे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Crocodile inside village school video trending on social media 21 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Crocodile Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या