22 December 2024 6:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Video Viral | हा चिमुरडा मोठेपणी स्टुडिओतून ओरडून पत्रकारीता करणारा होस्ट तरी होणार, नाहीतर कॉमेंटेटर, पहा व्हिडीओ

Child Funny Video Viral

Video Viral | लहान मुलं करामती असतात आणि हे कोणीही नाकारू शकत नाही. कोण शांत असतो मात्र करामती असतो आणि कोणी अगाऊ असतो आणि खोड्या करत असतो, कोणी रडका तर एखाद्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहूनच मोहक वाटते मात्र सर्व मुले जिव लावणारे असतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक लहान मुलं वर्गामध्ये बसलेल्या सर्व विद्यार्थांना कशा प्रकारे शिकवत आहे. पण तो ज्या पद्धतीने मुलांना सांगत आहे ते पाहून तुम्हाला देखील हसू येईल.

इंटरनेटवर प्रसिद्ध झाला मुलगा
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक लहान मुलगा आपल्या वर्गमित्रांना शिकवत आहे आणि या व्हिडीओमधील मुलाची एनर्जी पाहून कोणीही आनंदी होईल. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांनी ट्विटरवर शेअर केले आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा आपल्या वर्गमित्रांना ज्या आवेशाने शिकवत आहे, तो मोठ मोठ्याने ओरडताना दिसत आहे. यावेळी यूजर्स देखील म्हणाले मुलाची ऊर्जा अतुलनीय आहे.

व्हिडीओ झाला व्हायरल
अरुण बोथरा यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आणि पोस्टला कॅप्शन दिले आहे की, ” मी विचार करत आहे की हा मुलगा मोठा झाल्यावर काय बनेल, तो ड्रिल मास्टर बनेल की फुटबॉल कोच? लीडर? की टीव्ही अँकर.” व्हिडीओ इंटरनेटवर शेअर केल्यापासून 1 लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे तसेच क्लिप पाहिल्यानंतर वापरकर्ते खूप खूश आहेत आणि टिप्पणी करून व्हिडीओ शेअर सुद्धा करत आहेत. तसेच एका यूजरने लिहिले आहे की, या मुलामध्ये किती एनर्जी आहे तर दुसर्‍या वापरकर्त्याने टिप्पणी केली आहे की, “ट्रेंड पाहता, माझ्या मते याच्यासाठी टीव्ही अँकर ही सर्वात योग्य भूमिका असेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Funny Viral Video of kid class unmatched energy while teaching his classmates Checks details 22 October 2022.

हॅशटॅग्स

Child Funny Video Viral(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x