17 April 2025 10:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

भाजप नेते शिंदेंना ऑपरेट करतात? | फडणवीस झाले, आता गिरीश महाजनांचा व्हिडिओ व्हायरल, विरोधकांचा दावा खरा ठरतोय

Girish Mahajan

CM Eknath Shinde ​​| काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे भाजपाच्या खासदाराचं नाव घेण्यास विसरल्याचं देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी हळूच खिशातून पेन काढला आणि टेबलवर असलेल्या एका कागदावर खासदार धनंजय महाडिक यांचं नाव लिहिलं. कागद हळूच मुख्यमंत्र्यांपुढे केला आणि मुख्यमंत्र्यांनीही लागलीच कागदावरील नाव वाचून धनंजय महाडिकांचंही नाव घेतलं होतं आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यामुळे शिंदे हे पूर्णपणे भाजपच्या स्क्रिप्टवर चालतात असं म्हटलं जाऊ लागलं. मात्र आता अजून एक प्रकरण समोर आलं जातं आहे ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांना काय सांगून विषय टाळावा हे भाजपचे गिरीश महाजन सांगताना दिसत आहेत.

राज्‍याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी (ता. २०) जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. खडसेंच्‍या मुक्ताईनगरात त्‍यांची सायंकाळी जाहीर सभा पार पडली. पाळधी (ता. धरणगाव) येथे शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर एक जाहीर पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रामदास कदम यांनी केलेल्या विवादित वक्तव्यावरून प्रश्न विचारला. विशेष म्हणजे तो प्रश्न मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेत्यासंदर्भात होता. मात्र त्यावरही भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी शिंदेंना उत्तरावरून मॅनेज केल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. शिंदे उत्तर देतील त्यापूर्वीच गिरीश महाजन यांनी हातात असलेला पेपर आड तोंड लपवून ‘माहिती घेतो’ असं उत्तर देण्यास सांगितलं. इतक्या छोट्या-छोट्या विषयातही भाजपचे नेते शिंदेंना कसे ऑपरेट करतात हे पुन्हा सिद्ध होतंय. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना दुजोरा देणारे अनेक पुरावे समोर येतं आहेत. परिणामी वेदांता प्रकल्पावरून पडद्याआड शिंदेंची अवस्था कशी केली गेली असेल याचा प्रत्यय येतोय.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Girish Mahajan guidance to CM Eknath Shinde recorded in camera check details 22 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या