14 January 2025 6:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन एनर्जी शेअर तेजीत, रेलिगेअर ब्रोकिंग फर्मने दिले फायद्याचे संकेत - NSE: NTPCGREEN Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरवर मिरे अ‍ॅसेट कॅपिटल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर प्राईस 13 महिन्यांतील नीचांकी पातळीवर, आता जेपी मॉर्गन ब्रोकरेज बुलिश - NSE: TATASTEEL Income Tax Notice | बँक अकाउंटमध्ये चुकूनही 'या' 5 प्रकारचे ट्रान्झॅक्शन करू नका, इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा
x

Gulab Jamun Burger Video | गुलाब जामुन बर्गर बाजारात दाखल, असा बनवतात, व्हायरल व्हिडिओ पहा, खाण्यासाठी गर्दी

Gulab Jamun Burger Video

Gulab Jamun Burger Video | सोशल मीडियाच्या जमान्यात रोज वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. रोज एक नवा ट्रेंड येत असतो. अशा तऱ्हेने सध्या फ्युजन फूडचा ट्रेंड जोरात सुरू आहे. जिथे लोक जेवणाचे खूप प्रयोग करत असतात. हे फ्युजन फूड पाहिल्यानंतर सोशल मीडियावरही लोक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. (Gulab Jamun Ice Cream)

काही युजर्सना हे फ्युजन आवडलं, तर काही नेटिझन्स हे पाहून संतापही व्यक्त केला. लोक ग्राहकांना असे फ्युजन खाऊ घालत आहेत ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. अशातच आणखी एक फूड फ्यूजन व्हिडिओ समोर आला आहे. ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

सध्या बर्गरचे एक अनोखे फ्युजन समोर आले आहे. जो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तुम्ही आतापर्यंत बर्गर अनेकदा खाल्ले असतील, पण तुम्ही कधी रोझ बेरी बर्गर खाल्ले आहे का? गुलाब जामुन बर्गर आता बाजारात उपलब्ध झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लीक झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हा व्यक्ती गुलाब जामुन बर्गर बनवत आहे. सुरुवातीला विक्रेता बन बर्गर घेऊन त्यात गुलाब जामुन भरत आहे. नंतर गुलाब जाम कापून कढईवर भाजून घेतो. गुलाब जामुन बर्गर बनवण्याचा हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला. यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करताना दिसले.

@Khannajikiladki नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 8 सेकंदाचा हा व्हिडिओ इंटरनेटवर खळबळ माजवत असून या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. या विचित्र फ्युजनवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तर काही लोक नवीन जेवणाची चव चाखण्यासाठी दुकानाबाहेर रांगेत उभे आहेत.

News Title : Gulab Jamun Burger Video Viral check details on 22 July 2023.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x