22 January 2025 1:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई Bank Account Alert | तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती रोख रक्कम ठेवावी लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस आलीच समजा EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, खात्यात जमा होणार 1,56,81,573 रुपये, पगाराप्रमाणे रक्कम जाणून घ्या HDFC Mutual Fund | श्रीमंत करणारी HDFC म्युच्युअल फंडाची योजना, मिळेल तगडा परतावा, इथे पैसा वेगाने वाढतो
x

विद्या हवी असेल तर सरस्वतीला पटवा आणि पैसा हवा तर लक्ष्मीला पटवा, भाजप आमदाराकडून हिंदू देवी-देवतांचा भयंकर अपमान

BJP MLA

BJP MLA Banshidhar Bhagat | उत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये भाजप आमदार बंशीधर भगत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आमदार ‘विद्या हवी असेल तर सरस्वती पटाओ आणि पैसे हवे असतील तर लक्ष्मी’ पताओअसं धक्कादायक विधान करताना दिसत आहेत. आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार बोलत होते.

आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार बोलत होते :
या माहितीनुसार, उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील एका खासगी विवाह गृहात बालविकास विभागातर्फे आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात कलाधुंगीचे भाजप आमदार बंशीधर भगत यांना पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. येथे कार्यक्रमाला संबोधित करताना भाजप आमदाराची जीभ घसरली. अतिउत्साहात स्त्रीशक्तीचे महत्त्व व आपला मुद्दा समजावून सांगण्यासाठी ते बोलत राहिले.

मंत्री रेखा आर्याही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या :
उत्तराखंडच्या महिला सक्षमीकरण मंत्री रेखा आर्य याही या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. आमदार बंशीधर यांच्या या गोष्टी ऐकून कार्यक्रमात उपस्थित महिला आणि मुली थक्क झाल्या, हे व्हिडिओत पाहायला आणि ऐकायला मिळत आहे. त्याचवेळी स्टेजवर बसलेले पाहुणे सुद्धा हसू लागले असं दिसतंय. आमदार बंशीधर इथेच थांबले नाहीत. यानंतर त्यांनी भगवान शंकराबद्दलही भाष्य केलं. ते म्हणाला की, एक माणूस ईश्वर आहे. तो डोंगरावर थंड पडले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: If you want education then Saraswati ko Patao if you want money then Lakshmi ko Patao said BJP MLA 13 October 2022.

हॅशटॅग्स

#BJP India(18)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x