17 October 2024 12:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Trending Video | फिरायला गेलेले जोडपे अडकले लांडग्यांच्या विळख्यात, पुढे असं घडलं की विश्वास बसणार नाही, पहा व्हिडिओ BEML Share Price | रेल्वे कंपनीचा शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने देणार परतावा, यापूर्वी दिला 305% परतावा - NSE: BEML Reliance Share Price | रॉकेट वेगाने होणार कमाई, रिलायन्स इंडस्ट्रीज संबंधित बातमीचा परिणाम, BUY रेटिंग - NSE: RELIANCE Local Train Viral Video | धावत्या ट्रेनच्या दरवाजावर तरुणाची स्टंटबाजी; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल Horoscope Today | या 6 राशींसाठी उघडणार प्रेमाचे दरवाजे, चांगल्या जोडीदाराचा योग लाभेल, पहा तुमचे आजचे राशीभविष्य 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांनो, तुमची बेसिक सॅलरी 40, 50 की 60 हजार, DA सह एकूण पगार इतका वाढणार Senior Citizen Saving Scheme | महिना खर्चाची चिंता मिटेल, 'या' बचतीवर प्रत्येक 3 महिन्यांनी 1.20 लाख मिळतील, फायदाच फायदा
x

Local Train Viral Video | धावत्या ट्रेनच्या दरवाजावर तरुणाची स्टंटबाजी; काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ व्हायरल

Local Train Viral Video

Local Train Viral Video | सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण जगामध्ये कोणत्या गोष्टी घडत आहेत याचा वेळोवेळी आढावा मिळतो. दरम्यान तुम्ही आत्तापर्यंत तुमच्या सोशल हँडलवर अतरंगी सतरंगी व्हिडिओ अनेक वेळा पाहिले असतील.

काही कलाकार त्यांच्या कलाकृतींचे व्हिडिओ शूट करतात तर काहीजण ब्लॉगिंग, डान्स इतर माध्यमातून स्वतःला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. परंतु काही असे सुद्धा व्यक्ती आहेत ज्यांना नेमक्या कोणत्या व्हिडिओ करायच्या हेच कळत नाही. अगदी जीवा विशेष आणि जीवावर बेतणाऱ्या व्हिडिओ आजची तरुणाई करताना पाहायला मिळते.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका वायरल व्हिडिओ बद्दल सांगणार आहोत. ही व्हिडिओ एका तरुणाची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तरुण मुंबईच्या कोणत्यातरी स्टेशनवर ही स्टंटबाजी करताना दिसतोय. तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला तर तुमच्या काळजात नक्कीच धस्स होईल.

काय आहे व्हिडिओमध्ये :
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तरुण ट्रेन सुरू झाल्याबरोबर दरवाज्याला पकडतो मात्र तो फ्रेंचच्या आत नाही तर बाहेरच उभा असतो. ट्रेनच्या वेगानुसार दरवाजाला पकडून तो देखील बाहेरच्याच दिशेने म्हणजेच प्लॅटफॉर्मवरूनच चालू लागतो. नंतर ट्रेन अतिशय जलद वेगाने धावू लागते. त्यावेळी हात तरुण चक्क दरवाजाला पकडून आणि कमरेतून अर्धा वाकून आपले पाय सरळ करतो. सोबतच ट्रेनबरोबर भरदार वेगाने स्वतःचे पाय घसरत पुढे जातो आणि प्लॅटफॉर्म संपायच्या आत पटकन ट्रेनच्या आत उडी घेतो. हा संपूर्ण थरारक व्हिडिओ ट्रेनमधीलच एका व्यक्तीने रेकॉर्ड केला असावा.

 

View this post on Instagram

 

A post shared by @12345678_A1_R1 (@ranmzna3737)

ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणे आणि अशी जीवघेणी स्टंटबाजी करणे आतापर्यंत अनेकांच्या जीवावर बेतली आहे. तरीसुद्धा आजची तरुणाई हे असले स्टंट करून स्वतःचे हात पाय मोडून घेते. या आधी देखील एका तरुणाने अशीच स्टंटबाजी करून स्वतःचा एक हात आणि एक पाय गमावला आहे. अशा पद्धतीच्या लाखो घटना घडल्या असून सुद्धा तरुणाई डोक्यात हवा गेल्यासारखी वागते.

तरुणाई संतापली :
या तरुणाचा हा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर भरपूर प्रमाणात वायरल होत आहे. सोबतच व्हिडिओला हजारोंच्या संख्येने पाहिलं जात आहे. बऱ्याच व्यक्तींनी व्हिडिओला कमेंट करत संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडिओ ‘@ranmzna 3737’ या अकाउंट वर पोस्ट करण्यात आला असून एका युजरने कमेंट केली आहे की, “पुढील स्टेशन पोलीस स्टेशन असेल”, तर आणखीन एक म्हणतोय,”अशाने मोठे अपघात होतात”. अशा पद्धतीच्या बऱ्याच कमेंट्स या व्हिडिओला आल्या आहेत.

Latest Marathi News | Local Train Viral Video 17 October 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Local Train Viral Video(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x