28 April 2025 11:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, BUY रेटिंग - NSE: TATAPOWER Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, शेअर्सबाबत मोठी अपडेट, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATATECH NHPC Share Price | शेअर प्राईस 100 रुपयांहून कमी; देईल 34 टक्केपर्यंत परतावा, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Rattan Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक मालामाल करणार, 23 टक्के अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: RTNPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक खरेदी करा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL Horoscope Today | 29 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या AWL Share Price | कमाईची संधी सोडू नका; शेअर्समध्ये दिसणार मोठी तेजी, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: AWL
x

Viral Video | मुंबई नगरीतील प्रवास, हुश्श!!! मेट्रोतील गर्दीत किमान उभं राहण्यासाठी प्रवाशाने अशी ऍडजस्ट केली जागा

Mumbai Metro Video Viral

Viral Video | जगातील सर्वांत मोठी रेल्वे रुळ भारतामध्ये आहे आणि ती त्यातली त्यात महाराष्ट्रामध्ये आहे. मुंबई शहराचे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल जिथे रेल्वे नसेल तर आयुष्यच नाही. मुंबईच्या रेल्वेचा किंवा मेट्रोचा अनुभव बऱ्याच लोकांनी घेतला असेल. दरम्यान, मुंबई लोकल ट्रेनचे व्हायरल होत असणारे व्हिडिओ आपण अनेकदा पाहतो, पण आता मुंबई मेट्रोचा नवीन व्हिडिओ समोर आला आहे जो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मायानगरी मुंबईमध्ये लोकल ट्रेनच्या गर्दीतून लोकलमध्ये चढणे हे सर्रास घडतेच आणि याचे अनेक व्हिडीओ इंटरनेटवर पहायला मिळतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओने लोकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण हा व्हिडिओ मुंबईच्या लोकल ट्रेनचा नसून मुंबईच्या मेट्रोचा आहे, या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने मेट्रोमध्ये घुसताना लोकल ट्रेनचा फॉर्म्युला वापरला आहे जो यशस्वी सुद्धा ठरला आहे.

मुंबई मेट्रोचा मजेदार व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल
मुंबईमधील गर्दीने भरलेल्या या मेट्रो ट्रेनमध्ये घुसल्याचा प्रयत्न कशा प्रकारे यशस्वी ठरला ते पहा. तसेच एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 12 सेकंदांची ही क्लिप ‘मरोल, 3 वर्षांपूर्वी’ या कॅप्शनसह जीना खोलकर वापरकर्त्याने ट्विटरवर शेअर केली आहे दरम्यान, व्हिडिओमध्ये गुलाबी शर्ट घातलेला एक माणूस मेट्रोच्या खचाखच भरलेल्या डब्यामध्ये स्वत:साठी जागा मिळवण्यासाठी धडपडताना आपल्याला दिसून येत आहे मात्र मेट्रोमध्ये उपलब्ध असलेल्या कमी जागेत तो स्वत:ला कसा अॅडजस्ट करतो हे पाहणे रोचक आहे.

व्हिडीओ झाला व्हायरल
ही क्लिप तीन वर्षे जुनी असून मुंबईमधील मरोळ नाका मेट्रो स्टेशनवर हा व्हिडीओ शूट करण्यात आला आहे. दरम्यान, ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रवाशांच्या समायोजनाने इंटरनेट वापरकर्त्यांना आश्चर्यचकित केले आहे. तसेच या व्हिडीओवर कमेंट करत एका यूजरने लिहिले की, ‘मुंबई मेट्रोचा प्रवास दिवसेंदिवस मुंबई लोकलपेक्षा वाईट होत आहे’. दुसर्‍या वापरकर्त्याने म्हटले आहे की, ‘मुंबईप्रमाणेच आमच्या जीवनात समायोजन हा अधिक महत्त्वाचा भाग असतो.’ तसेच तिसऱ्या यूजरने लिहिले आहे की, ‘कृपा करून लोकांची चेष्टा करणे थांबवा. हा मुंबईकरांचा दिनक्रचम आहे. तर चौथ्याने गमतीने म्हटले आहे की, ‘मुंबईत प्रत्येकासाठी अशीच जागा आहे हा व्हिडीओ तेच दाखवत आहे’. व्हिडिओला 3 लाखांहून अधिक व्ह्यूज आणि जवळपास 200 लाईक्स मिळाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Mumbai Metro travelling video trending on social media Checks details 20 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Mumbai Metro Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या