Video Viral | कचरा उचलणाऱ्या वृद्ध महिलेचं आयुष्यच बदललं या तरुणाने, नेमकं काय केलं ते व्हिडीओत पहा
Old Women Video Viral | गरीबी वाईट असते हे कोणी नाकारू शकत नाही कारण एका वेळच्या जेवणासाठी लोक दिवस भर वनवन फिरत असतात. आपण अनेकदा हे दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे. वयस्कर लोक रस्त्याने फरत असतात तर वृद्ध महिला काठी टेवकत टेकवत काही तरी करताना दिसतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक वयस्कर महिला केरातून विकण्यासाठी सामान काढत आहे.
आज्जीचा व्हिडीओ होतोय व्हायरल
सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये, ब्लॉगर एका 75 वर्षीय महिलेला मदत करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला असून याकडे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी अवनीश शरण यांचे लक्ष गेले आणि त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडीो शेअर केला आहे तसेच ते अनेकदा प्रेरणादायी पोस्ट शेअर करत असतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या अलीकडील पोस्टमध्ये, IAS अधिकारी अवनीश शरण यांनी हा आज्जीचा अनोखा व्हिडीओ शेअर केला आहे आणि पोस्टला ‘इन्सानियत’ असे कॅप्शन देखील दिले आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कचरा उचलणाऱ्या वृद्ध महिलेचे आयुष्यच बदलून गेले
ब्लॉगर तरुण मिश्रा याने 3 ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे जो 90 सेकंदाचा आहे. व्हिडीओमध्ये दिसून येते की, ती महिला डस्टबिनमधून कचरा उचलत आहे, ती ब्लॉगरला सांगते की ती पैशांसाठी हा करचा विकते. तसेच तिची दुर्दशा पाहून ब्लॉगर तिला भाजी विक्रेता म्हणून नवीन व्यवसाय सुरू करण्यास मदत करतो आणि तो तिच्या घरी जातो आणि नंतर तिला आपल्या गाडीमधून बाजारात घेऊन जातो. व्यवसाय सुरू करण्यासाठी तो वृद्ध महिलेला हातगाडी, वजन काटा आणि भाजीपाला खरेदी करून देतो तसेच तो ब्लॉगर तिच्या घरातील रोजच्या गरजा भागवण्यासाठी त्या वृद्ध महिलेला किराणा सामान देखील विकत घेऊन देतो.
व्हिडिओ पाहून लाखो लोक झाले भावूक
अनेक इंटरनेट वापरकर्त्यांनी या हृदयस्पर्शी व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच एका वापरकर्त्याने म्हटले की, ‘हृदयस्पर्शी, भावपूर्ण आणि आशीर्वाद तरुणाने या वृद्ध महिलेसाठी नवीन व्यवसाय उघडून दिला आहे.’ दुसर्या वापरकर्त्याने टिप्पणी केली आहे की, ‘अनेक लोक धर्मादाय करतात परंतु त्यांनी हे शिकले पाहिजे की इतरांना मदत करण्यासाठी आणि त्यांना स्वयंरोजगार बनवण्यासाठी ही सर्वोत्तम कल्पना असू शकते.’
Humanity.🙏🙏🙏 pic.twitter.com/NUZTGEB6Cp
— Awanish Sharan (@AwanishSharan) October 18, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Old Women Video Viral Checks details 21 October 2022
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो