22 November 2024 11:25 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA
x

VIDEO | शिंदे सर्मथक आ. संतोष बांगर यांच्यावर बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा फिल्डिंग लावून हल्ला, बांगर सुसाट पळाले

Shivsena

MLA Santosh Bangar | हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर शिवसैनिकांकडून हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे संतोष बांगर आले होते. यावेळी काही संतप्त शिवसैनिकांनी संतोष बांगर यांची गाडी अडवली.

बंडखोर आमदारांवर शिवसैनिक अत्यंत आक्रमक हल्ले करू लागले आहेत. अमरावतीमध्ये शिंदे समर्थक आमदार संतोष बांगर यांचा ताफा अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जीमध्ये दाखल होताच संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या ताफ्यावर फिल्डिंग लावून हल्ला चढविला. गाडीच्या काचा बंद असल्याने बांगर थोडक्यात बचावले अन्यथा त्यांना जबर मारहाण झाली असती आणि तसे व्हिडिओ देखील समोर आले आहेत.

गाड्यांचा ताफा घेऊन पळून जाण्याशिवाय बांगर यांच्याजवळ दुसरा कोणताच पर्याय राहिला नाही. 50 खोके एकदम ओके, गद्दार अशा घोषणा तर शिवसैनिक देत होतेच पण ज्यावेळी संतोष बांगर यांची गाडी अंजनगाव सुर्जीमध्ये दाखल झाली त्यावेळी संतप्त शिवसैनिक थेट गाडीला आडवे गेले. गाडी थांबवली आणि बांगर दिसताच हल्ला चढवला. त्यामुळे स्थानिक पातळीवर शिवसैनिकांमध्ये किती रोष आहे याचा प्रत्यय आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Shivsena supporters attacked on rebel MLA Santosh Bangar at Amaravati check details 25 September 2022.

हॅशटॅग्स

MLA Santosh Bangar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x