18 November 2024 8:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Video Viral | जाम झालेले ट्रॅफिक स्विगी डिलिव्हरी बॉयने केले रिकामे, सामाजिक कर्तव्य बजावल्याने नेटिझन्सकडून कौतुक

Swiggy Delivery Boy Video Viral

Swiggy Delivery Boy Video Viral | मोठ मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिक होणं म्हणजे लोकांच्या अंगवळणी पडलेल्या गोष्टी आहेत. मात्र ज्या लोकांना 24 तास काम असते अशा लोकांसाठी या गोष्टी पचनी पडत नाहीत. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे या व्हिडीओमध्ये न दिसणारे अनोखे चित्र दिसून येत आहे. एक स्विगी डिलिव्हरी एजंट ट्रॅफिक पोलिसाची भूमिका बजावत आहे आणि त्याने 30 मिनिटांची वाहतूक कोंडी दूर केली आहे. या कृत्यामुळे त्याने लोकांची मने झिंकली आहेत आणि लोक त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. दरम्यान, सोशल मीडिया वापरकर्ता श्रीजीत नायरने लिंक्डइनवर हा व्हिडिओ शेअर केला असून तुम्ही यामध्ये पाहू शकता की, स्विगी डिलिव्हरी एजंट अवजड वाहनचालकांना रहदारीचा सामना करण्यासाठी मदत करत आहे. तसेच त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.दरम्यान, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, स्विगी ग्राहकांसाठी खाद्यपदार्थ डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीने रस्त्यावरचे ट्रॅफिक दूर करण्यासाठी आपला वेळ दिला आहे.

लिंक्डइनवर व्हिडिओ पोस्ट केला करण्यात आला आहे
श्रीजीत नायरने लिंक्डइनवर व्हिडीओ शेकर करत लिहिले आहे की, ‘मी 30 मिनीटांपेक्षा जास्त काळ ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो आणि अचानक मला ट्रॅफिक निवळताना दिसत होते. मला काही समजेनासे झाले मग मी जसजसा पुढे जाऊ लागलो तसतसे ट्राफिक पुढे जाऊ लागले. मग मला स्विगीचे एक खास विधान आठवले – डिलिव्हरी हिरो आणि आता मला समजले आहे की #Swiggy त्याला हिरो का म्हटले जाते. तसेच त्यांच्या दैनंदिन कामाव्यतिरिक्त, तेच आम्हाला त्रासमुक्त जीवन जगण्यास मदत करतात यामध्ये काही वाद नाही. या वीरांना माझा सलाम. हा व्हिडीओ कुठे शूट करण्यात आला आहे हे अध्याप कळू शकलेले नाही.

व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर युजरने हे लिहिले की
श्रीजीथ नय्यरने काही दिवसांपूर्वी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता आणि तेव्हापासून त्याला 2,000 हून अधिक लाईक्स तसेच अनेकांनी कमेंट्स सुद्दा केल्या आहेत. इंटरनेट वापरकर्त्यांनी स्विगी एजंटच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि त्यांच्या वैयक्तिक वचनबद्धतेचे देखील कौतुक केले आहे. पोस्टला उत्तर देताना स्विगीने लिहिले की, ‘सर्व हिरो कॅप घालत नाहीत, काही स्विगी जॅकेटच कॅप घालतात!’ दुसर्‍या वापरकर्त्याने म्हटले की, ‘हे स्विगीमुळे झाले नाहीये. ही त्यांची समाजाप्रती असलेली वैयक्तिक बांधिलकी होती आणि हे स्विगीने नव्हे तर त्यांच्या पालकांनी शिकवले संस्कार होते. किमान #swiggy तुम्हाला श्रेय घेण्याऐवजी ते स्वीकारावे लागेल.’

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Swiggy Delivery Boy video trending over traffic controlling checks details 21 October 2022.

हॅशटॅग्स

Swiggy Delivery Boy Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x