6 February 2025 12:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

VIDEO | राज्याच्या भल्यासाठी बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवायचे आहे, अशी जाहीर घोषणा रामदास कदमांनी केली होती

Viral Video

Ramdas Kadam ​​| आदित्य ठाकरेंच्या शिव संवाद यात्रेला प्रत्युत्तर म्हणून आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात रामदास कदमांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. ‘मी बाळासाहेबांचा मुलगा आहे, असं किती वेळा सांगणार? काही संशय आहे का? आम्ही कधी नाही म्हटलं आहे का? उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा नाही, असं कधी कुणी म्हणाल्याचं ऐकलंय का? तुम्हाला बाळासाहेबांचं नाव का सांगावं लागतं? तुमचं काही कर्तृत्व आहे का?’, रामदास कदम उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले. त्यानंतर शिवसैनिकांमध्ये वातावरण तापलेलं आहे. काल दापोलीमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये राडा झाला होता. दोन्ही गटाकडून एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली. ठाकरे गटाकडून रामदास कदम यांचा निषेध सुरु आहे.

किशोरी पेडणेकर यांची टीका :
‘रामदास कदम यांनी पातळी सोडली हे अख्खा महाराष्ट्र पाहतोय. यापूर्वी नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीस हे रामदास कदम यांच्याबद्दल काय म्हणालेत ते ऐका, त्यानंतर त्यांच्या वर्तमानकाळ सांगेन. भूतकाळापासूनच पक्ष फोडण्याची यांच्या मनात दुही माजली होती. राणेच म्हणाले की रामदासने मला तोंडावर पाडलं. विरोधी पक्ष आणि त्याची गाडी मिळाली की टूनकण जाऊन उडी मारून बसला. फडणवीस म्हणाले रामदास भाई तुमचा पगार किती आणि बोलता किती? यापूर्वी दोनदा शिवसेना सोडून राष्ट्रवादीत जाणार होता.” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

12 आमदारांच्या यादीत स्थान मिळावं म्हणून लाळघोटेपणा करणारा हा नेता. बाळासाहेब जेव्हा ऐकायचे नाही तेव्हा वहिनींकडे जाऊन मस्का मारायचा. हा भाई म्हणण्याच्या पण लायकीचा नाही. बरं झालं घाण गेली. आमच्या महिलांच्या नजरेतून ते उतरले. नालायक निघालात. राक्षसी वृत्ती दाखवली.

शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचं सांगून अचानक स्वतः मुख्यमंत्री झाले असा आरोप करणाऱ्या रामदास कदम यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. मार्मिकच्या एका कार्यक्रमात म्हणजे महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी रामदास कदम शिवसैनिकांना उद्देशून जाहीरपणे म्हणाले होते की, “गाफील राहू नका, आम्हाला सगळ्यांना उद्धवजींना मुख्यमंत्री बनवायचय ते एवढ्यासाठीच की तो महाराष्ट्र आपल्याला घडवायचा आहे, आणि हा महाराष्ट्र बाळासाहेबांचे पुत्र आणि वाघाचा छावा उद्धवजी ठाकरे हेच घडवू शकतात हा विश्वास माझ्यामध्ये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: VIDEO of Ramdas Kadam on Uddhav Thackeray check details 21 September 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x