18 November 2024 7:14 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Video Trending | पंतप्रधान मोदींनी स्वतः कर्नाटकातील भाजपच्या माजी भ्रष्ट मंत्र्याला कॉल करून आशीर्वाद दिले, व्हिडिओ व्हायरल

Video Trending

Video Trending | कर्नाटकचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार के. एस. ईश्वरप्पा यांनी नुकतीच भष्टाचाराच्या प्रकरणावरून निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शिवमोग्गा मतदारसंघातून आपल्या मुलाला उमेदवारी न देताही भाजपला विजय मिळवून देण्यासाठी ईश्वरप्पा मदत करत असल्याने त्यांचे कौतुक केले. मी तुमचं काम पाहून प्रभावित झाला आहे असं मोदी कॉलवर म्हणाले आणि त्यांना आशीर्वाद देखील दिले.

पंतप्रधान मोदींनी फोनवर काय म्हटले?
या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी हे देखील संवाद साधताना बोलत आहेत की, जेव्हा जेव्हा ते कर्नाटक राज्याचा दौरा करतील तेव्हा ते त्यांना नक्की भेटतील. त्याला उत्तर देताना ईश्वरप्पा यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, आगामी निवडणुकीत भाजपच जिंकेल. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ईश्वरप्पा म्हणाले की, पंतप्रधान मला फोन करतील असे स्वप्नातही वाटले नव्हते. त्यांच्या फोन कॉल्समुळे मला प्रेरणा मिळाली आहे. शिवमोगा शहरात आम्ही निवडणूक जिंकू. कर्नाटकात भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.

कोण आहेत के. एस. ईश्वरप्पा?
कर्नाटक सरकारमधील मंत्री (तत्कालीन) के. एस. ईश्वरप्पा हे गेल्या वर्षी कर्नाटकातील राजकारणात प्रचंड चर्चेत आले होते. त्याच्यावर कंत्राटदार संतोष पाटील याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईश्वरप्पा याच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे. कंत्राटदार संतोषचा भाऊ प्रशांत यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंत्राटदार संतोष पाटील हा उडुपी येथे मृतावस्थेत आढळला होता. मृत्यू पूर्वी त्यांनी एका मित्राला एक मेसेज पाठवला होता, ज्यात त्यांनी आपल्या मृत्यूसाठी मंत्री ईश्वरप्पा यांना जबाबदार धरले होते. मृत्यूच्या काही दिवस आधी संतोष पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्रही लिहिलं होतं, ज्यात त्यांनी आरोप केला होता की, ईश्वरप्पा कामाच्या मोबदल्यात त्यांच्याकडे 40 टक्के कमिशन ची मागणी करत आहेत. मात्र मंत्र्यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.

के. एस. ईश्वरप्पा यांची गणना कर्नाटकात भाजपच्या मोठ्या नेत्यांमध्ये केली जाते. ईश्वरप्पा कर्नाटक सरकारमध्ये ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री होते. ईश्वरप्पा हे तेच नेते आहेत ज्यांनी गेल्या वर्षी कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. येडियुरप्पा यांना हटवण्याची मागणीही त्यांनी हायकमांडकडे केली होती आणि येडियुरप्पा मुख्यमंत्री राहिले तर पुढची निवडणूक जिंकणे अवघड होईल, असे म्हटले होते. यानंतर अनेक आमदार ईश्वरप्पा यांच्यासोबत आले होते आणि त्यानंतर येडियुरप्पा यांना राजीनामा द्यावा लागला होता. कर्नाटक मधील तत्कालीन मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्या भ्रष्टाचारामुळेच आज कर्नाटकात निवडणुकीच्या दरम्यान 40 टक्के कमिशनचा मुद्दा अत्यंत प्रभावी ठरला आहे. त्याच भ्रष्ट के. एस. ईश्वरप्पा यांना आता मोदींनी स्वतः मोबाईलवर कॉल करून आशीर्वाद दिल्याने भाजपाची अजून पंचायत झाली आहे. कर्नाटक काँग्रेसने हा व्हिडिओ शेअर करत मोदी भ्रष्ट नेत्यांना आशीर्वाद देतात हे स्वतःच सिद्ध करत करत असल्याचं काँग्रेसने म्हटले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Video Trending on social media of PM Modi called KS Eshwarappa ahead Karnataka assembly election 2023 check details on 21 April 2023.

हॅशटॅग्स

#Video Trending(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x