5 January 2025 3:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | डोळे झाकून गुंतवणूक करावी अशी SBI फंडाची योजना, महिना बचतीवर मिळेल 35 कोटी रुपये परतावा Property Knowledge | तुम्ही खरेदी करत असलेली प्रॉपर्टीची कागदपत्रे बनावट नाहीत ना, अशी खात्री करून घ्या, मोठं नुकसान टाळा OnePlus 13 | वनप्लस 13 स्मार्टफोनची जबरदस्त एन्ट्री, स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि प्राईस डिटेल्स जाणून घ्या Tata Mutual Fund | टाटा तिथे नो घाटा, जबरदस्त फंड, रु.9000 एसआयपी वर मिळेल 35 लाखांहून अधिक परतावा EPFO Passbook | पगारदार EPF खातेधारकांसाठी मोठी अपडेट, मिळणार नवीन ATM कार्ड, EPF चे पैसे सहज काढता येणार Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, झटपट मोठी कमाई करा, रेकॉर्ड तारीख नोट करा Personal Loan | कर्जदारांसाठी अलर्ट, आता दर 15 दिवसांनी तुमचा क्रेडिट रेकॉर्ड तपासाला जाणार, हा फायदा देखील होईल
x

Video Viral | लेकीचं बापासाठी नितळ प्रेम, वडिलांना स्वीगी मध्ये नवीन नोकरी लागली आणि लेकीच्या डोळ्यात पाणी, व्हिडिओ व्हायरल

Daughter And Father Video Viral

Video Viral  | माई लेकरांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमामात व्हायरल होत असतात. दरम्यान, असाच काहीसा प्रकार घडला आहे जो इंटरनेटवर सध्या धुमाकुळ घालत आहे. एका मुलीचा आणि तिच्या वडिलांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की वडील आपल्या मुलीला सरप्राईज देतात जे मुलीला इतके आवडते की ती आनंदाने उड्या मारायला सुरुवात करते. व्हिडिओ पाहून तिच्या वडिलांना फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीमध्ये नोकरी मिळाल्याचे दिसून येत आहे.

बाप आणि मुलीचा व्हिडीओ झाला व्हायरल
हा व्हिडिओ पूजा अवंतिका नावाच्या युजरने इन्स्टाग्राम रीलवर अपलोड केला असून, वडिलांचे सरप्राईज पाहून मुलीने आनंदाने उडी मारली आहे. तसेच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये यूजरने लिहिले आहे की, अप्पांची नवीन नोकरी, आता मी माझे आवडीचे पदार्थ खाऊ शकते. हा व्हिडिओ आठ लाखांहून अधिक वेळा पाहिला आहे. तसेच 51 हजारांहून अधिक लाईक्स आणि हजारो कमेंट्स या व्हिडीओला आल्या आहेत.

व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की, मुलगी नुकतीच शाळेतून घरी आली आहे. ती तिचे डोळे बंद करते आणि काही वेळाने डोळे उघडले तर समोर तिचे वडील स्विगी टी-शर्ट घेऊन उभारलेले दिसतात. त्याच्या वडिलांना नवीन नोकरी मिळाल्याचे दिसून येते आहे आणि यावर मुलगी आनंदाने उडी मारते आणि वडिलांना मिठी मारते.

यूजर्सनी दिल्या शुभेच्छा
या व्हिडीओला यूजर्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच एका यूजरने लिहिले की, “सर, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला अशी परी सारखी मुलगी मिळाली आहे. तर “दुसरा म्हणाला, “मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला शुभेच्छा देतो. तसेच “तिसर्‍या व्यक्तीने लिहिले आहे की, “हे खूप सुंदर दृश्य आहे..ऑल द बेस्ट अण्णा. तसेच “एकाने लिहिले आहे की, “देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद देत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.”

 

View this post on Instagram

 

A post shared by pooja avantika (@pooja.avantika.1987)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Video video of father gets Naukri in Swiggy daughter cute reaction trending in social media checks details 18 October 2022.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x