5 February 2025 3:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL SBI Special FD Scheme | मजबूत परताव्यासाठी एसबीआयच्या 'या' स्पेशल FD मध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षांतच पैसे दुप्पटीने वाढतील Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल Penny Stocks | वडापाव पेक्षा स्वस्त किंमतीचा पेनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SARVESHWAR Penny Stocks | श्रीमंत करणार हा स्वस्त शेअर, पाच दिवसांत 65 टक्के परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 51259 RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Post Office Scheme | महिना खर्च भागेल, दरमहा 9,250 रुपये देईल ही पोस्ट ऑफिस योजना, नक्की फायदा घ्या
x

Video Viral | भारतीयांनो, चीन अरुणाचल प्रदेशात घुसून बांधकाम करू लागला, स्थानिक रहिवाशांनी दिली माध्यमांना माहिती, व्हिडिओ पहा

Video Viral

Video Viral Chinese construction work in Arunachal Pradesh | अरुणाचल प्रदेशच्या अंजाव जिल्ह्यातील स्थानिक भारतीय रहिवाशांनी एका महत्त्वाच्या घडामोडीत, छगलगाममधील हादिगरा-डेल्टा 6 जवळ चीन पीएलए (पीपल्स रिपब्लिक आर्मी) जवान बांधकाम करत असलेल्या मशीनरीचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. इंडिया टुडेच्या सूत्रांनी पुष्टी केली की एखाद्या व्यक्तीस या ठिकाणी पोहोचण्यासाठी साधारणत: चार दिवस लागतात आणि एलएसी (प्रत्यक्ष नियंत्रण रेषा) जवळील जिल्ह्यातील छगलगम हे शेवटचे प्रशासकीय पोस्ट आहे असाही समोर आलं आहे.

हा व्हिडिओ 11 ऑगस्ट 2022 रोजी स्थानिक भारतीय रहिवाशांकडून रेकॉर्ड करण्यात आला होता आणि या स्थानिकांनी इंडिया टुडेशी बोलताना, बीजिंगच्या कथित घुसखोरीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. भारत-चीन सीमेला लागून असलेल्या शी योमी जिल्ह्यातील मेचुका या गावच्या एका रहिवाशाने एलएसीजवळ चीनने पायाभूत सुविधा विकसित केल्याच्या नुकत्याच आलेल्या वृत्तावर चिंता व्यक्त केली आहे आणि भारत सरकार एवढं थंड का बसलंय हे देखील समजण्यापलीकडील आहे असं मत व्यक्त केलं आहे. याचे काय परिणाम होतील यावर देखील स्थानिक भारतीय खूप चिंता व्यक्त करत आहेत.

स्थानिकांच्या माहितीनुसार, यापूर्वी त्यांचे पूर्वज १९६२ च्या भारत-चीन युद्धापूर्वी तिबेटला भेट देत असत आणि स्थानिक वस्तूंच्या बदल्यात तिबेटमधून मीठ, तांदूळ, दागिन्यांचा व्यापार करून वस्तुविनिमय पद्धतीत गुंतले होते, अशी माहितीही मेचुका येथील रहिवाशांनी इंडिया टुडेच्या प्रतिनिधींना दिली.

मात्र आता, भारतीय लष्कर कोणालाही आंतरराष्ट्रीय सीमेजवळ जाऊ देत नाही,” असे नमूद करताना या रहिवाशाने सांगितले की, भारतीय बाजूच्या पायाभूत सुविधा ठीक नाहीत आणि पश्चिम सियांग जिल्ह्यातील मेनचुका ते अलो शहराला जोडणारा एकच रस्ता एक दशकाहून अधिक काळ येथे अस्तित्वात आहे.

चार लेन तयार करण्याचे काम पूर्ण :
चीनने सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी चार लेन तयार करण्याचे काम पूर्ण केले आहे. मेणचुका येथेही शाळा आणि वैद्यकीय संस्थांमध्ये सुविधांचा अभाव असल्याने छोट्या रुग्णालयात फारच कमी डॉक्टर उपलब्ध असून शाळांमध्ये शिक्षकांचा अभाव आहे. मेचुका येथे एकही महाविद्यालय नाही आणि विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शहरी शहरांमध्ये स्थलांतरित होत आहेत,” असे या रहिवाशाने सांगितले.

मोदी पंतप्रधान झाले तर चीन … अमित शाहंचं सत्तेत येण्यापूर्वीचं ट्विट व्हायरल :
तेव्हा सत्तेत येण्यापूर्वी अमित शहा म्हणाले होते, ‘सध्याच्या राजवटीत देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत, असा दावा करून भाजप नेते अमित शहा यांनी सांगितले होते की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर पाकिस्तानी घुसखोर भारतीय हद्दीत घुसण्याची हिंमत करणार नाहीत. मात्र यूपीए सरकारच्या काळात, जेव्हा जेव्हा चिनी सैनिकांची इच्छा असेल, तेव्हा ते आमच्या हद्दीत येऊन पिकनिक करतात आणि युपीए सरकार काहीही करू शकत नाही,”असं शाह म्हणाले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Video Viral Chinese construction work in Arunachal Pradesh video trending on social media check details 27 August 2022.

हॅशटॅग्स

#China(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x