Video Viral | काय ही राक्षसी प्रवृत्ती, शुल्लक वादातून तरुणाला चालत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिले, घटना कॅमेऱ्यात कैद
Train Fight Video Viral | एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जर तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, एक व्यक्ती चालत्या ट्रेनच्या दरवाजाजवळ उभा राहून समोरच्या व्यक्तीशी वाद घालत आहे. मात्र दोघांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारीला सुरुवात होते आणि ती हाणामारी इथपर्यंत पोहोचते की, ती एक व्यक्ती दुसऱ्याला उचलून चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकून देते. याप्रकरणी त्या व्यक्तीला अटक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
आधी बाचाबाची मग हाणामारी आणि परत,
व्हायरल झालेला हा व्हिडिओ हावडा-मालदा इंटरसिटी एक्स्प्रेसमधील असल्याचे सांगितले जात आहे. तसेच ही घटना शनिवारी रात्री घडली आहे आणि दोघांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर शिवीगाळ सुरू झाला परत एकाने दुसऱ्यावर हात उचलला आणि आरोपीने त्याला चालत्या ट्रेनमधून खाली ढकलून दिले. त्यानंतर व्हिडिओच्या आधारे जीआरपीने त्या संशयिताला अटक केली आहे.
संशयिताला अटक केली
धक्काबुक्की केल्यानंतर आरोपी काही घडलेच नाही असे वर्तन करायला लागला मात्र त्या जागी आणखी कोणी तरी उपस्थित होते जे हे संपुर्ण प्रकरण पाहत होते आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग करत होते. तसेच व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, दोघांचे भांडण सुरु होते आणि ते एवढ्या स्थरा पर्यंत जाते की, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ट्रेनमधून बाहेर फेकून देते. दरम्यान, जखमीला रामपूरहाट येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले आहे तसेच शेख यांचे घर सुंदीपूर गावात असल्याचे पोलिसांनी सांगितले यावेळी सांगितले आहे.
In a shocking incident a passenger in the Howrah-Malda Intercity Express pushed off a man from the running train and then nonchalantly uttered prayers and went back to his seat. The incident took place on Saturday night, pic.twitter.com/GKQv6ucvfs
— AH Siddiqui (@anwar0262) October 17, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Video Viral of man pushed out another person from running train at Birbhum video trending checks details 19 October 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
- Child Investment Plan | 1000 रुपयांची गुंतवणूक करा आणि तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करा; इतर फायदेही मिळतील
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो