21 January 2025 3:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SIP Vs PPF Scheme | सर्वाधिक पैसा कुठे मिळेल, वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून कुठे अधिक परतावा मिळेल Wipro Share Price | आयटी शेअरमध्ये सुसाट तेजीचे संकेत, विप्रो शेअर मालामाल करणार, टार्गेट नोट करा - NSE: WIPRO IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, PSU स्टॉक फोकसमध्ये, तेजीचे संकेत - NSE: IREDA HFCL Share Price | एचएफसीएल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HFCL Quant Mutual Fund | पगारदारांसाठी मार्ग श्रीमंतीचा, फंडाची ही योजना 4 पटीने पैसा वाढवते, संधी सोडू नका Jio Finance Share Price | तेजीने कमाई होणार, जिओ फायनान्शियल शेअरसाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करतोय, तेजी कायम राहणार का, ब्रोकरेज बुलिश - NSE: APOLLO
x

Viral Video | रॅगिंग संबंधिचा व्हिडिओ पाहिला का; तरुणांचा घोळका आणि हॉटेल रूममधील तो धडकी भरवणारा व्हिडिओ होत आहे वायरल

Viral Video

Viral Video | दहावीची परीक्षा दिल्यानंतर लगेचच आपण कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं याची धडपड अनेक विद्यार्थी तरुणांमध्ये सुरू होते. आपल्याला उच्च शिक्षणासाठी चांगले कॉलेज आणि शिक्षक लाभावे यासाठी बरेच तरुण मेहनत आणि धडपड करत असतात.

बऱ्याच तरुणांना हवे तसे कॉलेज मिळते तर, काहींना काही कारणांमुळे नावडत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावी लागते. तुम्ही आत्तापर्यंत रॅगिंग हा प्रकार केवळ कॉलेज विश्वात होत असताना ऐकला असेल. कारण की वरिष्ठ तरुणांना नवीन विद्यार्थी तरुणांची रॅगिंग घ्यायला मजा येते. रॅगिंग हा एक प्रकारचा गुन्हा आहे. तरीसुद्धा आपण अनेकदा रॅगिंगचे थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहत असतो. नोएडामधील असाच एक रॅगिंग संबंधिचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान वायरल होत आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये :
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका हॉटेल रूमवर तरुणांचा प्रचंड घोळका पाहायला मिळत आहे. त्यानंतर काही तरुण रूमच्या दिशेने धावत जातात आणि रूममधील असलेल्या काही तरुणांना लाखा बुक्क्यांनी बेदम मारहाण करतात. हा संपूर्ण थरारक व्हिडिओ ‘ndtvIndia’ या वृत्ताने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून नोएडाची बातमी दिली आहे.

अकाउंटवर व्हिडिओ शेअर करत व्हिडिओला असं कॅप्शन लिहिलं आहे की,’ नोएडामध्ये रॅगिंगला विरोध केला म्हणून वरिष्ठ विद्यार्थ्यांनी ज्युनियरचे हातपाय तोडले’. कॅप्शन वाचूनच अनेकांच्या काळजात धस्स झाल्यासारखं झालं आहे. या वायरल व्हिडिओला नेटकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात वायरल केलं असून लाखोंच्या संख्येने लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by NDTV India (@ndtvindia)

व्हिडिओला भरभरून प्रतिसाद :
वायरल झालेल्या व्हिडिओला वेगवेगळ्या कॉलेजमधील अनेक तरुणांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. काही जणांचं म्हणणं आहे की, हा नेहमीचाच प्रकार आहे. रॅगिंगसारखा प्रकार कायम कानावर पडत असतो. अनेक तरुणांनी हास्यस्पद कमेंट देखील केल्या आहेत.

Latest Marathi News | Viral Video 13 November 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x