23 February 2025 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा
x

Viral Video | जगातील सर्वात तरुण फिनलँडच्या महिला पंतप्रधान सना मरिन यांचा पार्टीत दारू पिऊन गोंधळ, व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Viral | फिनलंडच्या पंतप्रधान सना मरिन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती दारू पिताना आणि मैत्रिणींसोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही क्लिप मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. इकडे हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर सना विरोधी पक्षांच्या निशाण्यावर आली आहे. पंतप्रधान सना मरिन यांनी मित्रांसह ड्रग्जचे सेवन केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. विरोधक त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

सना मरिनने कबूल केले :
माहितीनुसार, बुधवारी ही घटना घडली. सना मरिनने कबूल केले आहे की त्या त्यांच्या मित्रांसह मद्यपान करत होत्या परंतु ड्रग्स घेण्याच्या चर्चेला अफवा असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान सना मरीन यांनी विरोधकांना आव्हान दिले आणि सांगितले की, ती ड्रग टेस्टसाठी तयार आहे.

मला माहित होते की :
मला माहित होते की आमचा व्हिडिओ बनविला जात आहे परंतु तो सार्वजनिक करण्यात आला याबद्दल मला वाईट वाटले. मात्र, आम्ही कोणतीही चूक केलेली नाही. आम्ही पार्टी केली, नाचलो आणि गायलेही.

ड्रग्जच्या आरोपांवर त्या म्हणाला की, मी चाचणीसाठी तयार आहे. “मी आजपर्यंत ड्रग्जचं सेवन केलेलं नाही. व्हिडिओमध्येही आपण कुठेही असं काही करताना दिसत नाही. तसेच मी कोणत्याही ड्रग्ज वापरणाऱ्यांना ओळखत नाही. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपले कौटुंबिक जीवन आणि व्यावसायिक असल्याचे सांगत स्वत:चा बचाव केला. याशिवाय थोडा मोकळा वेळही त्यांना आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत घालवायचा असतो अशी प्रतिकीया दिली.

व्हिडिओ पहा :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video Finland PM Sana Marin was seen drinking and dancing in party video viral on social media 19 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x