23 February 2025 2:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Viral Video | भाजपशासित राज्यात नरक यातना, अँब्युलन्स नाकारल्याने मृत आईचं शव बाईकवर बांधून मुलाचा 80 किमी प्रवास

Viral Video

Viral Video | मध्य प्रदेशातून हृदय पिळवटून टाकणारी एक घटना समोर आली आहे. वाहनांअभावी दोन भावांना आपल्या आईचा मृतदेह दुचाकीवर बांधून ८० किमी दूर घरी घेऊन जावा लागला. या प्रकरणाबाबत भावंडांनी सांगितले की, त्यांना ना रुग्णालयात उपचार मिळाले ना मृतदेहासाठी अँब्युलन्स. “आम्ही खासगी शव वाहनाचा शोध घेतला पण ते ५ हजार रुपयांची मागणी करत होते. आमच्याकडे तेवढे पैसे नव्हते त्यामुळे आम्हाला असे पाऊल उचलावे लागले. माहितीनुसार, गेल्या रविवारी ही घटना घडली, ज्याचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. जिल्हा रुग्णालयावर कारवाई करण्याची मागणी युजर्सकडून केली जात आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण :
जयमंत्री यादव असं मृत महिलेचं नाव असल्याचं सांगण्यात येत आहे. मृत महिला जयमंत्री या मध्य प्रदेशातील अनुपपूरच्या गोदारू गावच्या रहिवासी होत्या. छातीत त्रास होत असल्याने कुटुंबीयांनी त्यांना जिल्हा रुग्णालय शहडोल येथे दाखल केले होते. प्रकृतीस्वास्थ्य अधिक बिघडल्याने नसल्याने शनिवारी रात्री 11 वाजता त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान दुपारी 2.40 वाजता त्यांचा मृत्यू झाला.

आईच्या मृत्यूनंतर मृताचा मुलगा सुंदर यादव याने जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांवर उपचारादरम्यान निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला आहे. सुंदर यादव सांगतात की, आईच्या उपचारात निष्काळजीपणा झाला होता. तिला योग्य उपचार मिळाले असते तर ती आज जिवंत असती. सुंदर यादव यांनी आईच्या मृत्यूसाठी वैद्यकीय रुग्णालय व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. आईच्या मृत्यूनंतर आम्ही हॉस्पिटलकडे बॉडी व्हेईकलची मागणी केली पण आमचं कुणीच ऐकलं नाही. पैसे नव्हते त्यामुळे खासगी वाहन सुद्धा मागवता येत नव्हतं. म्हणून त्याने 100 रुपये किंमतीचा लाकडी ट्रॅक विकत घेतला आणि नंतर दुचाकीवर आपल्या आईचा मृतदेह बांधला आणि शाहडोलहून अनुपपूर जिल्ह्यातील गुडारू गावात पोहोचला.

काय आहे व्हिडीओ :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video from Madhya Pradesh man forced to carry mother corpse 80 KMS bike after ambulance rejected video viral on social media 05 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x