6 February 2025 12:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

Viral Video | रिक्षाचालकाने यू-टर्न घेण्यासाठी चक्क पादचारी पुलावरून रिक्षा फिरवली, थक्क करणारा व्हायरल व्हिडिओ

Viral video

Viral Video | हायवेवर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा यासाठी रस्त्यांवर फूट ओव्हरब्रिज बांधले जातात. रस्त्यावर फूट ओव्हरब्रिज झाल्यानंतर लोक रस्ता ओलांडताना याचा उपयोग करतात. हे सहसा व्यस्त रस्त्यांवर बांधले जाते. यामुळे पादचाऱ्यांना मदत होते, मात्र महाराष्ट्रातील पालघरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

जिथे, गजबजलेल्या मुंबई-अहमदाबाद हायवेवर यू-टर्न घेण्यासाठी एका व्यक्तीने आपली रिक्षा पादचारी पुलावरून चालवली. पादचारी पुलावरून जाणारी रिक्षा पाहून तिथे उपस्थित लोकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्या व्यक्तीचे कारनामे देखील पाहू शकता. रोड्स ऑफ मुंबई नावाच्या ट्विटर हँडलनेही हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस चालकाला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. या व्हिडिओवरून महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये ही घटना घडल्याचं दिसत असून चालकाला पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. “अधिक माहितीसाठी आम्ही व्हिडिओचा अभ्यास करत आहोत. पादचारी पुलावर चालकाने आपली रिक्षा चालविण्यासाठी रॅम्पचा वापर केला.

पहा व्हिडिओ :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video man drives auto rickshaw on foot overbridge to cross highway video viral details 21 August 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x