23 February 2025 11:26 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा
x

Viral Video | लहाल बाळ पाचव्या मजल्यावरून पडताना पाहिलं, त्यानंतर त्याने जे केलं ते चमत्कारिक होतं, पहा व्हिडिओ

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हा व्हिडिओ पोस्ट होताच तो वेगाने व्हायरल होऊ लागला. यामध्ये तुम्हाला दिसेल की, इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एक मूल खाली कोसळतं. पण त्याला सुपरहिरोसारख्या माणसाने वाचवलं. या घटनेचा व्हिडिओ पाहून कोणाचेही मन हेलावून जाऊ शकते. ही घटना चीनमध्ये कुठेतरी घडली. तो माणूस वेळीच पोहोचला नसता तर त्या मुलाचा जीव जाऊ शकला असता. आता लोक उशीर न करता सुपरमॅनप्रमाणे मुलाला वाचवणाऱ्या माणसाचं कौतुक करत आहेत.

पाचव्या मजल्यावरून पडली चिमुकली :
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उंच इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून मूल घसरून खाली कोसळतं. ती थेट पहिल्या गच्चीवर पडते. मग ती तिथून घसरते आणि जमिनीवर कोसळू लागते. पण तिथून पळताना एक माणूस येऊन त्या मुलाला पकडतो. त्या पुरुषासोबत एक स्त्रीही दिसते. ज्या पद्धतीने चपळाई दाखवून त्या व्यक्तीने मुलाचा जीव वाचवला, ते कौतुकास्पद आहे.

सुपरमॅनप्रमाणे माणसाने वाचवले :
या व्यक्तीने लवकरात लवकर मुलाचा जीव वाचवला आणि आता लोक त्याला सुपरहिरो आणि सुपरमॅन म्हणून संबोधत आहेत. हा व्हिडिओ साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने आपल्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केला आहे. हा व्यक्ती झेजियांग प्रांताचा रहिवासी असून त्याचे वय ३१ वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. शेण डोंग टोंगजियांग असं त्याचं नाव आहे. जिथे मूल पडलं, तिथे ते जवळच्याच एका बँकेत काम करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video man who catch little girl falling form fifth floor check video 23 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x