Viral Video | अबब! जगातील भयंकर आणि विशाल आकाराचा साप कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ पाहूनच धडकी भरेल
Viral Video | हॉलिवूड चित्रपटांमधील अॅनाकोंडा हा सापाचा चित्रपट तुमच्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने महाकाय विशाल साप दाखवले आहेत ते खरोखर प्रत्यक्षात आहेत का? असा प्रश्न तुमच्या मनात अनेकदा आला असेल. सध्या सोशल मीडियावर एका विशाल अजगराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना घाम फुटलाय. (Trending Video on social Media)
भारतीय वन सेवेतील अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर या अजगराचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये एक भलामोठा अजगर सरपटताना दिसत आहे. आजवर तुम्ही इतका मोठा आणि विशाल अजगर कधीच पाहिला नसेल. हा व्हिडिओ पोस्ट करत सुशांत यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, पृथ्वीवरील सर्वात मोठा आणि बलाढ्य असा अजगर.
हा अजगर पृथवीवरील सर्वाधिक लांब अजगर आहे. आपले शिकार पकडण्यासाठी तो सरपटत पुढे जाताना दिसत आहे. पुढे या अजगराची माहिती देत त्यांनी कॅप्शमध्ये लिहिले आहे की, हे अजगर अगदी एका झटक्यात एखाद्या व्यक्तीचा जीव घेऊ शकतात. त्यांच्यामध्ये १४ PSI इतकी ताकत असते. आपल्या ताकतीच्या जोरावर ते एखाद्या माणसाला सहज गुदमरून मारू शकतात.
हे साप इतके बलाढ्या आणि मोठे असले तरी ते बिनविषारी असतात. आपल्या भक्षासाठी त्यांना विष असणे गरजेचे नसते. ते वेटोळे घालत शिकार करतात. अशा प्रकारचे साप हे पाण्यापासून थोडे दूर आढळतात. त्यांची प्रजाती आता काही प्रमाणावर कमी होत चालली आहे. अशा सापांच्या प्रजाती ठरावीक लहान बेटांवर राहतात.
The longest & one of the heaviest snakes of planet. A Reticulated Python climbs the wall to reach out for its prey in Myanmar.
Reticulated Python are constrictors and kill prey by squeezing them to death. The python’s squeezing force is about 14 PSI enough to kill human beings. pic.twitter.com/ruRFVNIFiP
— Susanta Nanda (@susantananda3) March 29, 2023
सापाच्या कातडीपासून औषध
सुशांत यांनी या सापाविषयी सांगताना पुढे लिहिले आहे की, या सापांची प्रजाती आता कमी होत चालली आहे. व्यक्ती त्यांची शिकार करतात. तसेच त्यांच्या कातडीचा वापर विविध प्रकारची औषधे बनवण्यासाठी केला जातो. या विशाल सापाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत ४४ हजारांहून अधिक व्यक्तींनी हा व्हिडिओ पाहिलाय. सापाच्या या प्रजातीविषयी तुम्हाला अधिक माहिती असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Viral Video of biggest python trending on social media check details on 02 April 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Shark Tank India | 'इससे अच्छा तो ठेला लगा लो', शार्क टँक सीझन 4 मध्ये अनुपम मित्तलने स्पर्धकांचा अपमान का केला
- CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील
- IRFC Share Price | रेल्वे स्टॉक फोकसमध्ये, टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, होईल मजबूत कमाई - NSE: IRFC
- BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीने परतावा देणार डिफेन्स कंपनी शेअर - NSE: BEL
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर घसरतोय, पण ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
- Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ, ब्रोकरेजने दिले संकेत - NSE: TATATECH
- Post Office Schemes | दररोज 100 रुपये वाचवून पोस्टाच्या 'या' भन्नाट योजनेत गुंतवा, मिळेल लाखो रुपयात परतावा
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले सकारात्मक संकेत, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
- Business Idea | 'हे' 4 प्रकारचे व्यवसाय सुरू करा ; लाखोंच्या घरात पैसे कमवाल ; इथे पहा पूर्ण डिटेल्स
- Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा