17 April 2025 5:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Viral Video | महिलेला धक्काबुक्की आणि शिवीगाळ, दादागिरी करणाऱ्या भाजप नेत्याच्या व्हायरल व्हिडिओवर देशभरातून संताप

Viral Video

Viral Video | भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये हा भाजप नेता एका महिलेला शिवीगाळ करताना दिसत आहे. इतकंच नाही तर भाजप नेत्यानं यावेळी महिलेला धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला, हे प्रकरण नोएडा सेक्टर 93 मधील ओमेक्स सोसायटीशी संबंधित आहे. महिला आणि भाजप नेत्यामध्ये झाड लावण्यावरुन वाद झाल्याचं बोललं जात आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण :
या व्हिडिओमध्ये दिसत असलेली व्यक्ती म्हणजे भाजपचे किसान मोर्चाचे नेते श्रीकांत त्यागी. ओमेक्स सोसायटीत बनवलेले उद्यान बेकायदेशीररित्या बळकावून त्यागी बांधकाम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप होत आहे. सोसायटीतील रहिवासी दररोज याबाबत तक्रारी करत असतात. याशिवाय त्यागी यांना १५ दिवसांत अवैध कब्जा हटविण्याची नोटीसही देण्यात आली आहे.

उद्यान खासगी मालमत्तेसारखा रुबाब :
घटनेच्या दिवशीही त्यांनी येथे 20 हून अधिक झाडे लावली, त्यामुळे हे उद्यान खासगी मालमत्तेसारखी हा नेता भासवत होता. त्याचवेळी सोसायटीत राहणाऱ्या एका महिलेने अशा उद्यानात झाड लावून ते वाईट पद्धतीने बळकाविण्याच्या तिच्या प्रयत्नाला आक्षेप घेतला असता, त्यागी याने तिच्याशी गैरवर्तन केले. त्याचवेळी त्यांनी त्यांच्याशी हुज्जत घालण्याचाही प्रयत्न केला, मात्र या दरम्यान तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने गुपचूप या घटनेचा व्हिडिओ बनवला, जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नेता महिलेला आणि आजूबाजूच्या लोकांना धमकी देत आहे की, त्यांनी त्यांच्या प्लांटला हात लावू नये.

व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर एफआयआर :
व्हायरल व्हिडिओ समोर आल्यानंतर नोएडा पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. भाजप नेते श्रीकांत त्यागी यांच्यावर महिलेशी गैरवर्तन आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of BJP leader Shrikant Tyagi abuses woman in posh colony Noida video went viral on social media 06 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या