Video Viral | भाजप आमदार गाय घेऊन विधानसभेच्या आवारामध्ये पोहोचले, माध्यमांना बाईट देताना गर्दी होताच गाय सुसाट पळून गेली
Viral Video BJP MLA Suresh Singh Rawat | गेल्या 2 वर्षांपासून जगभरामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यातुन लोक उभारी घेत आहेत तो पर्यंत प्राण्यांमधील एक रोग समोर आला आहे ज्याचे नाव लंपी आहे. दरम्यान, लम्पी व्हायरसकडे राजस्थान सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपचे आमदार सोमवारी गाय घेऊन विधानसभेच्या आवारात पोहोचले. काही वेळानंतर ती गाय या गोंगाटामुळे पळून जाते आणि तिचा शोध आमदार घेताना आपल्याला दिसून येते. या सर्व घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजप आमदार पोहोचले विधानसभेच्या आवारात
राजस्थान विधानसभेच्या अधिवेशनाची बैठक सोमवार पासून सुरु झाली आहे. पुष्करमधील भाजप आमदार सुरेश सिंह रावत गाय घेऊन विधानसभेच्या आवारामध्ये पोहोचले आहेत. यावेळी माध्यमांनी त्यांचा मागोवा घेतला आणि त्यावेळी ते म्हणाले की, राजस्थानमधील सर्व गाईंना लंपी रोगाने विळखा घातला आहे. मग सरकार झोपले आहे का? असाही प्रश्न यावेळी त्यांनी सरकारला केला. विधानसभेच्या आवारात जमलेल्या गदारोळामुळे गाय घाबरू लागली, आमदारांच्या हातातून निसटून ती आवारात धावू लागते तर तिच्या मागे दोन माणसे त्या गाीला पकड्यासाठी मागे धावताना दिसतात.
विधानसभेच्या आवारातून गाय पळून गेली
पुढे आमदार रावत म्हणाले की, रोगाने त्रस्त झालेल्या गोमातकडे सर्वांचे लक्ष वेधले जावे म्हणून मी गोमाताला विधानसभेच्या आवारात घेऊन आलो आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, हे बघा, या सरकारच्या भीतीने ही गाई सुद्धा पळून गेली. या लंपी आजारामुळे गाई त्रस्त होत आहे. यांचे औषधोपचार कोण करणार, सरकारचे लक्ष कुठे आहे?
सीएम गेहलोत यांनी केंद्राकडून लस मागवली
आमदारांनी गाई विधानसभेच्या आवारामध्ये आणली या मुद्द्यावर राष्ट्रीय लोकशाही पक्षाचे (आरएलपी) तीन आमदार सभागृहात घोषणाबाजी करण्याच्या दिशेने प्लिंथसमोर धरणे धरून बसले होते. यावेळी या आमदारांनी हातामध्ये ‘गौमाता करे पुकार हमसे बचालो सरकार’ अशी पोस्टर्स घेतली होती तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सभागृहाच्या आवारात पत्रकारांना सांगितले की, केंद्र सरकारने लुंपी रोगाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करावे. पुढे ते म्हणाले की, ‘त्वचेच्या आजारापासून गायींचे प्राण कसे वाचवता येतील, याला आमचे कायमच प्राधान्य आहे, परंतु भारत सरकार लस देईल, औषधे उपलब्ध करून दिली जातील, अशा परिस्थितीत आम्ही भारत सरकारकडे मागणी करत आहोत की तुम्ही जाहीर करा.
भाजपा विधायक सुरेश रावत गाय को लेकर विधानसभा पहुंचे थे लेकिन गाय को पता चल गया ये सिर्फ कोरी राजनीति कर रहे हैं
देखिए गाय कैसे पीछा छुड़ाकर भाग गईpic.twitter.com/p5Wo58jKvO
— Nigar Parveen (@NigarNawab) September 19, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Viral video of BJP MLA Suresh Singh Rawat trending on social media checks details 20 September 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- Property Buying | जमीन किंवा एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करताय, या गोष्टींची खबरदारी घ्या, अन्यथा मोठं नुकसान होईल
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा की - NSE: NBCC
- NTPC Share Price | NTPC कंपनीबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: NTPC