23 February 2025 9:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार Gratuity on Salary | प्रायव्हेट नोकरदारांसाठी खुशखबर, ग्रॅच्युइटी एकूण 3,46,154 रुपयांची रक्कम खात्यात जमा होणार EPFO Money Alert | खासगी नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात EPF चे 1,01,29,237 रुपये जमा होणार, तुमचा महिना पगार किती Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या
x

Viral Video | त्या तरुणीने अचानक स्कूटी रस्त्याच्या मध्येच पार्क केली, कारण व्हिडिओत पहा, कपाळावर हातच माराल

Viral Video

Viral Video | सोशल मीडियात तुम्ही जराही अॅक्टिव्ह असाल तर तुम्ही असे व्हिडिओ पाहिले असतील, ज्यात मुली स्कुटी चालवताना असं काही करतात की हसणं थांबत नाही. उदाहरणार्थ, स्कुटी थांबवावी लागते तेव्हा काही मुली ब्रेक मारण्याऐवजी पायाने थांबवण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा इतरांशी शर्यत करताना अपघात होतो. कधीकधी ते असे काहीतरी करतात ज्यामुळे हसणे थांबवणे कठीण होते. तसाच काहीसा एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतो आहे. विषय असा आहे की, जेव्हा स्कुटी चालवणाऱ्या एका मुलीने असं काही केलं, ते पाहताच नेटिझन्स कपाळावर हात मारून घेत आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना हसणं आवरणं कठीण झालं आहे.

रोडवर मध्येच पार्क केलेली स्कूटी :
समोर आलेल्या या मजेशीर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी विनाहेल्मेट रस्त्यावर स्कूटी चालवत आहे. पण पुढच्या काही सेकंदानंतर ती स्कूटी वाहतुकी रहदारीच्या रोडवर मध्ये उभी करून फुटपाथच्या दिशेने जाऊ लागते. तिने स्कुटी वाहतुकीच्या रस्त्यावरच पार्क केल्याने लगेच ट्रॅफिकला अडथळे येऊ लागतात. कारण ही तरुणी स्कुटी रस्त्याच्या मध्ये पार्क करून तिला रस्त्याच्या कडेला दिसलेल्या मैत्रिणीला भेटायचे असते. गप्पांच्या ओघात आजूबाजूला ट्राफिक होऊ लागतं आणि नंतर त्या तरुणीची ट्यूब पेटू लागते.

नंतर लगबगीने ती तरुणी पुन्हा रोडच्या मध्ये पार्क केलेल्या स्कुटीला बाजूला घेऊन जाण्यास येते. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाल्यावर तो व्हिडिओ समाज माध्यमांवर सुद्धा प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर समाज माध्यमांवर प्रचंड हास्य विनोद सुरु झाले आहेत. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लाखो वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडिओला नेटकऱ्यांनीही पसंती दिली आहे. याला १.७१ दशलक्षाहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

नेमका व्हिडिओ काय आहे पहा :

 

View this post on Instagram

 

A post shared by memes comedy (@ghantaa)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of Girl gone viral on social media when she suddenly parked scooter on middle of the road check details 31 July 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x