22 April 2025 7:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांच्या HRA मध्ये बदल होणार, हिशेबही नवीन बेसिक प्रमाणे, अपडेट जाणून घ्या EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Viral Video | किंग कोब्रा साप कपाटाच्या ड्रॉव्हरमध्ये, करामती माणूस आला, पकडून गरगर फिरवलं आणि.. तो क्षण कॅमेऱ्यात कैद

Viral Video

Viral Video | सापांच्या विषारी प्रजातीमध्ये सर्वाधिक विषारी जात म्हणजे किंग कोब्रा. किंग कोब्रा हा असा साप आहे ज्याच्या एका दंशाने माणूस जागेवरच मृत्यू पावतो. अशात असा खतरनाक साप जर घरातल्या कपाटात निघाला तर. निश्चितच हा साप पाहून भल्या भल्यांना घाम फुटेल. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये किंग कोब्रा सापाला एका व्यक्तीने दोन्ही हातांनी पकडलेलं दिसत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एका घरामध्ये असलेल्या कपाटात हा किंग कोब्रा साप लपून बसला आहे. आता हा साप बाहेर काढण्यासाठी या घरातील सदस्यांनी एका सर्प मित्राला बोलावलं आहे. सदर व्यक्ती साप पाहून सुरुवातीला त्याची शेपटी आपल्या हातात पकडतो. त्यानंतर संपूर्ण साप बाहेर काढण्यासाठी तो दोन्ही हाताने त्याला बाहेर खेचतो.

आता सापाची शेपटी पकडली म्हणजे साप उलट फिरून फना काढत त्या व्यक्तीला दंश करण्याची शक्यता होती. मात्र हा व्यक्ती एखाद्या खेळण्याप्रमाणे न घाबरता हा साप बाहेर खेचतो. साप बाहेर आल्याबरोबर त्या व्यक्तीवर फना काढतो. तितक्यात हा व्यक्ती त्या सापाला दोन्ही हातांनी पकडून हवेत गरगर फिरवतो. यावेळी सापाला काहीच समजत नाही.

साप जोरजोरात हवेत फिरवून हा माणूस त्याचे तोंड आपल्या दुसऱ्या हाताने पकडून ठेवतो. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, त्या व्यक्तीच्या एका हातात सापाचे तोंड आहे आणि दुसऱ्या हातात शेपटी. त्यानंतर तो सापाला कपड्यांना जसा पिळा मारतात अगदी तशा पध्दतीने सापाला पिळा मारत आहे.

काळजात धडकी भरवणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. माणसाने सापासोबत केलेला हा स्टंट पाहून नेटकरी चकित झालेत. आतापर्यंत या व्हिडिओला लाखो व्हिव्ज मिळालेत. तसेच हा खतरनाक स्टंट पाहून नेटकरी यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of King Cobra Snake in Home check details on 03 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या