16 April 2025 10:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Viral Video | व्हिडिओसाठी कोब्राला चुंबन द्यायला गेला, नंतर कोब्राने पलटी मारून चुंबन दिलं, गेला थेट इस्पितळात, व्हिडिओ पहा

Wild Animal Video Viral

Viral Video | अनेकदा सोशल मीडियावर असे व्हिडीओ व्हायरल होतात जे पाहून अंगावर काटे येतात. धोकादायक प्राण्यांसोबतचे व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. कधी हे व्हिडिओ मजेदार असतात तर कधी लोकांना घाबरवण्याचे काम करतात मात्र आज आम्‍ही तुम्‍हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत, जो पाहून काही युजर्स हसत राहतात, तर काहीजण हा व्हिडिओ पाहून थक्क झाले आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये एका माणसाच्या हातामध्ये कोब्रा दिसून येत आहे आणि तो त्याच्या डोक्यावर चुंबन घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु अचानक असे काही घडते की त्या व्यक्ती खाली पडते.

सर्पदंशामुळे व्यक्ती जमीनीवर घायाळ पडला
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका व्यक्तीच्या हातामध्ये कोब्रा आहे आणि तो त्याच्या डोक्यावर चुंबन घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र चुंबन घेताना तो कोब्रा अचानक त्या व्यक्तीला चावतो, चावल्यामुळे तो व्यक्ती जमीनीवर पडतो. कोब्रा सरपटत पुढे जातो आणि त्याच्या मागे एक मुलगा भरणी घेऊन त्याला पकडण्यासाठी जातो मात्र तो काही त्याच्या हाती लागत नाही. दरम्यान, व्हायरल झालेला व्हिडिओ कर्नाटकातील शिवमोग्गा जिल्ह्यातील आहे, येथे भद्रावतीच्या बोम्मनकट्टे येथे, अॅलेक्स नावाचा माणूस सापांना वाचवण्याचे आणि त्यांना जंगलात सोडण्याचे काम करतो.

अॅलेक्सला हॉस्पिटलमध्ये दाखल केले
मीडिया रिपोर्ट्सनुसार, साप चावल्यानंतर अॅलेक्सला भद्रावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते तर अॅलेक्सचा जीव वाचला असून तो आता बरा असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत, अनेक यूजर्स त्या व्यक्तीसाठी नाराज दिसत होते तर अनेक युजर्सने अॅलेक्सच्या या मूर्खपणावर टीका केली आहे. यूजर रोहितने लिहिले की, आजकाल लोक प्रसिद्धीसाठी काहीही करायला तयार असतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of Kobra bites man who tried kiss him video trending checks details 03 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Wild Animal Video Viral(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या