19 April 2025 11:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

Viral Video | लग्नातील व्हिडिओशूटसाठी वधू-वराने केला हा प्रकार, आग थेट वधूच्या चेहऱ्यावर, व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात लग्नाचा दिवस हा आयुष्यातील सर्वात मोठा आणि सुंदर दिवस असतो. व्यक्ती या खास दिवसाला अधिक सुंदर बनवण्यासाठी आपले खास क्षण कॅमेऱ्यात कैद करतात. आजकाल प्री विडिंग शूट, लग्नात वधू आणि वराचा स्पेशल डान्स अशा गोष्टी हमखास पहायला मिळतात. यासह सोशल मीडियावर हिट व्हावं किंवा काहीतरी वेगळं करण्यासाठी अनेक जोडपी आपल्या लग्नात गॅसचे फुगे हवेत सोडणे, स्प्रे उडवणे किंवा मग केकमध्ये एखादी वस्तू लपवणे अशा गोष्टी करताना दिसतात. अशात सध्या सोशल मीडियावर एका लग्नात स्टंटबाजीमुळे दुर्देवी घटना घडली आहे.

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्रातील एका लग्नात वधू आणि वर दोघेही स्पार्क गन उडवताना दिसत आहेत. हातात स्पार्कची बंदूक घेत या दोघांनी सुंदर पोज दिली आहे. कॅमेऱ्यासमोर पोज देत दोघेही हातातली स्पार्क बंदूक हवेत उडवतात. तितक्यात वधूच्या हातात असलेल्या बंदूकीचा स्पोट होतो आणि तिच्या चेहऱ्यावर आगीच्या ठिणग्या उडतात. त्यामुळे वधूचा चेहरा काही प्रमाणात भाजतो.

बंदूकीचा स्पोट होताच उपस्थित व्यक्तींमध्ये एकच खळबळ उडते. सर्वजण वधूच्या दिशेने धावत येतात. १३ सेकंदांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या घटनेत वधूचे पुढे काय झाले हे समजू शकले नाही. विविद शर्मा या व्यक्तीने त्यांच्या ट्वीटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, लोकं आपल्या आयुष्यातील या खास क्षणांना अशा प्रकारे का उध्वस्त करतात.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ वाऱ्याच्या वेगाने पसरला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला १५ हजारांहून अधिक व्यक्तींनी पाहिलं आहे. सदर घटना पाहून अनेकांनी वधूबाबत काळजी व्यक्त केली आहे. तसेच असे स्टंट किती महागात पडू शकतात हे देखील काही जण कमेंटमध्ये सांगत आहेत. लग्न समारंभात काहीतरी हटके करण्याच्या नादात या जोडप्याला चांगलीच अद्दल घडली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of marriage video shooting video trending on social media on 04 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या