18 November 2024 6:16 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Viral Video | रामलीलामध्ये हनुमानाची भूमिका करणाऱ्या व्यक्तीचा अचानक मृत्यू, शेपटीला खरोखर आग लावून सुरु होतं नृत्य, व्हिडीओ व्हायरल

Viral Video

Viral Video |  अनेकदा आपण सोशल मीडियावर व्हिडीओ पाहिले असतील की, चालू क्रर्यक्रमामध्ये अचानक घटना घडते आणि जागीच मृत्यू होतो. दरम्यान, अशीच एक घटना घडली आहे जी सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नाटक चालू आहे आणि हनुमान आपली करतबगारी दाखवत आहे. अचानक हनुमानाच्या शेपटीला आग लागते आणि हनुमान खाली पडतो आणि काही वेळांमध्येच त्याचा मृत्यू होतो.

दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यानंतर मृत घोषित करण्यात आले
दरम्यान, ही घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील सलेमपूर गावातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रामलीलामध्ये हनुमानाची भूमिका करणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीचा स्टेजवरच मृत्यू झाला आहे. हनुमानाची भुमिका साकारनारे राम यांच्या बनावट शेपटीला अचानक आग लागते आणि त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “रामलीलाच्या परफॉर्मन्सदरम्यान हनुमानाच्या शेपटीला आग लागल्याच्या काही वेळातच, राम हनुमानाचे पात्र साकारत होते, ते जमिनीवर पडले आणि काही मिनिटांतच त्यांचा मृत्यू झाला, त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

रामलीला साकारताना झाला मृत्यू
रामलीला साकारताना हनुमानाच्या भुमिकेमध्ये असणारे राम यांच्या शेपचीला अचानक आग लागते व त्यांना हृदयविकाराचा झटका देखील येतो. घटनेच्या वेळी राम स्वरूप यांची पत्नी अनुसूया आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते तर गावप्रमुख गुलाब यांनी सांगितले की, राम स्वरूप हा हातगाडी चालवायचा व “त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी रूपा आहे.” पोलिसांना न सांगता कुटुंबीयांनी रविवारी सायंकाळी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहेत. धाटा स्टेशनचे प्रभारी प्रवीण कुमार यांनी सांगितले की, ही घटना त्यांच्या निदर्शनास आली असून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे पथक गावात भेट देणार आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of Ramlila Hanuman role paying man died during Ramlila Checks details 04 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x