15 January 2025 2:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Viral Video | तीन महिला वॉकिंग करत होत्या, भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने चिरडलं, व्हिडिओचा दुसरा अँगल सुद्धा व्हायरल

Viral Video

Viral Video | सध्या रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. हैदराबादमधील बंदलागुडा रोडवर मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात तीन महिलांचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या महिलांना सनसिटी बांदलगुडा येथे एका कारने धडक दिली. यात आई, मुलगी आणि आणखी एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पसार झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची व्यवस्था केली. तिघांचे मृतदेह उस्मानिया रुग्णालयाच्या शवागारात हलविण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार वेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे पादचाऱ्यांची धडक झाली. मात्र या अपघाताचे दोन अँगल समोर आले आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये या महिला फुटपाथ सोडून रस्त्याच्या कडेने चालत होत्या आणि त्यावेळी मागून वेगात येणाऱ्या कारच्या चालकाला ते लक्षात आलं असता त्याने हलका टर्न मारण्याचा प्रयत्न केला असता साडीवरील नियंत्रण सुटल्याचे देखील दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय.

हे आहेत हे दोन्ही व्हिडिओ :

अशीच एक घटना आज महाराष्ट्रात घडली आहे जिथे अनियंत्रित कंटेनर रस्त्याजवळील एका ढाब्यात घुसला. मुंबई-आग्रा महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. धुळे जिल्ह्यातील पळसनार गावात मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, ट्रक भरधाव वेगाने जात होता. महामार्गावरील चार वाहनांना प्रथम धडक दिली. यानंतर तो महामार्गाच्या कडेला असलेल्या एका ढाब्यात शिरला.

दुपारी अनेक जण धाब्याच्या आत जेवण करत होते. तेव्हा ढाब्याशेजारील बसस्टॉपवर काही लोक बसची वाट पाहत उभे होते. ट्रकच्या धडकेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण गंभीर जखमी झाले आहेत.

News Title : Viral Video of road accident caught on CCTV check details on 04 July 2023.

हॅशटॅग्स

#Vital Video (1)(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x