22 February 2025 7:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

Viral Video | काळजाचा ठोका चुकला! सिनेमाप्रमाणे घडलं, ती समुद्रात उडी मारणार इतक्यात टायगर शार्क आला आणि...?

Viral video

Viral Video | आजच्या काळात सोशल मीडियावर सर्व व्हिडिओ व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यात समुद्रात बोट चालवायला जाणारी मुलगी थोडक्यात बचावली आहे. हा व्हिडिओ विदेशातील असल्याचे सांगितले जात असले तरी पुन्हा तो भारतात सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

व्हिडिओनुसार, मुलीने डायव्हिंगची सर्व उपकरणे परिधान केली आहेत. ती बोटीतून उतरून समुद्रात जाण्याचा प्रयत्न करत असताना लगेच समोरून एक मोठा शार्क येतो. शेवटच्या क्षणी शार्कला पाहून मुलीने आपली पावले मागे खेचली. यावेळी शार्कने पाण्याच्या वर येऊन तोंड उघडले तेव्हा भयावह चित्र दिसून आले. जर मुलीने समुद्रात उडी मारली असती तर शार्कने हल्ला करून खाऊन टाकले असते यात शंका नाही. पण सुदैवाने ती थोडक्यात बचावली हे व्हिडिओमध्ये दिसतंय.

मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटरवर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. सर्व अकाऊंट्सवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. ‘नियर टू डाई’ नावाच्या ट्विटर अकाऊंटवर या व्हिडिओला १७ लाख व्ह्यूज मिळाले आहेत. याशिवाय 1800 हून अधिक युजर्सनी री-ट्वीट केले आहे.

हा व्हिडिओ खरंतर गेल्या वर्षी ऑक्टोबर 2022 चा असल्याचं सांगण्यात येत आहे. हवाई येथे ही घटना घडली. त्यावेळी व्हिडिओ शेअर करताना शार्कचे वर्णन राणी निकी असे करण्यात आले होते. तर डायव्हर म्हणजेच मुलीचे नाव ओशन रामसे असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेबद्दल बोलताना रामसे म्हणाले होते की, “मी शार्क पाहिला होता आणि तो खूप जवळचा होता. त्यामुळे मला जहाजावर परत यावं लागलं.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of woman diving ocean nearly dies shark came open mouth watch details on 21 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x