22 December 2024 11:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, टॉप 5 म्युच्युअल फंड योजना मालामाल करत आहेत, अनेक पटीत पैसा वाढवा Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE Ashok Leyland Share Price | बंपर कमाई होणार, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा
x

Video Viral | फायर ब्रिगेडच्या जवानाने आत्महत्या करू पाहणाऱ्या महिलेचा जीव तर वाचवलाच, पण तिला अद्दल सुद्धा घडवली

Women Suicide Video Viral

Video Viral | पर्नसल लाईफ किंवा अन्य कारणांमुळे लोक डिप्रेशन मध्ये जातात आणि कधी कधी आत्महत्या करण्यास सरसावतात. अनेकदा आपण सोशल मीडियावर सुसाईडचे व्हायरल होत असेलेले व्हिडीओ पाहिले असतील. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल. देवदुता प्रमाणे एका व्यक्तीने महिलेचा जीव वाचवला आहे. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक महिला आत्महत्या करण्यासाठी उंच इमारतीच्या खिडकीमध्ये कशा प्रकारे बसली आहे. तर चला आपण हा व्हिडीओ पाहूयात.

उंच इमारतीच्या खिडकीतून उडी मारण्याची योजना फसली
हा व्हायरल होणार व्हिडीओजर तुम्ही पाहिलातर तुमच्या लक्षात येईल की, एक महिला उंच इमारतीच्या खिडकीमध्ये आत्महत्या करण्यासाठी बसली आहे. तर पुढच्या काही क्षणांमध्ये तिथे असे काही घडते की, तुम्हाला धक्का बसेल. महिलेच्या आत्महत्या बचावाची ही घटना जपानमधील आहे तसेच या घटनेचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, एक महिला खिडकीच्या बाहेर पाय सोडून बसली आहे आणि ती कोणत्याही क्षणी खाली उडी मारेल, पण त्याच क्षणी एक ट्विस्ट येतो. देवदुता प्रमाणे अग्निशमन दलामधील एका व्यक्तीने वरून येऊन महिलेला धक्का दिला, ज्यामुळे ती महिला घरामध्ये पडली आणि त्यामुळे तिचा जीव वाचला.

अग्निशमन दलाने वाचवला महिलेचा जीव
माध्यमांच्या माहितीनुसार, जेव्हा ती महिला आत्महत्या करणार होती, खालून तिला पाहताच लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. यावेळी प्रत्येकजण तिला आत्महत्या करण्यापासून रोखत होते, परंतु जेव्हा महिलेला लोकांचे ऐकण्यास मान्य नव्हती तेव्हा अग्निशामक दलाने तिचा जीव वाचवण्याचा अनोखा मार्ग शोधला म्हणायला हरकत नाही. तो महिलेच्या वरच्या मजल्यावर गेला आणि नंतर तेथून दोरीच्या सहाय्याने खाली आला आणि महिलेच्या खिडकीजवळ येताच तिला आत ढकलून दिले. या धक्क्यामुळे महिला खोलीत पडल्याने तिचा जीव वाचला. अग्निशमन दलातील तो व्यक्ती वरच्या मजल्यावर गेला आणि सुपरमॅन प्रमाणे उडी मारत या महिलेचा जीव वाचवला आहे.

व्हायरल झाला व्हिडीओ
दरम्यान, व्हायरल झालेला हा व्हिडिओ usman__haruna नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की एका जपानी अग्निशामकाने या महिलेला आत्महत्येपासून वाचवले आहे… चांगले काम आहे. ट्विटरवरती हा व्हायरल व्हिडिओ 48 लाखांहून अधिक युजर्सनी पाहिला आहे तसेच वापरकर्ते या फायर फायटरचे खूप कौतुक करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of women Suicide attempt failed in Japan Video trending Checks details 18 October 2022.

हॅशटॅग्स

Women Suicide Video Viral(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x