18 November 2024 4:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Video Viral | हे हिंदुत्ववादी नेते? साहेब! 'हिंदुत्वका भगवा लहरायेंगे' असं बोला याची कदमांनी तोंडावर हात ठेवून आठवण करून दिली

Viral Video

CM Eknath Shinde in Ayodhya | अखेर अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदार, खासदारांसह रविवारी अयोध्येत पोहोचले. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करत त्यांनी राम लल्लाच्या मंदिरात पूजा केली. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र सरकारचे अनेक मंत्री, पक्षाचे खासदार आणि आमदार उपस्थित होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?
एकनाथ शिंदे म्हणाले की, “शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे अयोध्येत भव्य दिव्य राम मंदिर उभारण्याचे स्वप्न होते, जे पंतप्रधान मोदींनी पवित्र भूमीवर मंदिराचे बांधकाम सुरू करून पूर्ण केले. संपूर्ण वातावरण भगवेमय झालं आहे. राममय झाले आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

आज राममंदिराच्या उभारणीचे कामही पाहिले. सगळ्यांना वाटायचं की राम मंदिर कसं बांधणार? लोक म्हणायचे ‘मंदिर वहीं बनाएंगे, लेकिन तारीख नहीं बताएंगे? पण पीएम मोदींनी ते करून दाखवलं आणि तारीखही सांगितली. जे शंका उपस्थित करत होते, त्यांना घरी बसवलं आहे”, अशी टीका देखील मुख्यमंत्री शिंदेंनी केली.

एकनाथ शिंदे म्हणाले, संपूर्ण वातावरण भगवेमय झालं आहे. राममय झाले आहे. आज राममंदिराच्या उभारणीचे कामही पाहिले. सगळ्यांना वाटायचं की राम मंदिर कसं बांधणार? लोक म्हणायचे ‘मंदिर वहीं बनाएंगे, लेकिन तारीख नहीं बताएंगे? पण पीएम मोदींनी ते करून दाखवलं आणि तारीखही सांगितली. जे शंका उपस्थित करत होते, त्यांना घरी बसवलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना रामायणातील ‘रावण’ या पात्राची उपमा दिली आहे.

साहेब! ‘हिंदुत्वका भगवा लहरायेंगे’ असं बोला – रामदास कदम
दरम्यान, पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा पाठांतर विसरले का याची चर्चा सुरु झाली आहे. कारण, पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे यांना रामदास कदम स्वतःच्या तोंडासमोर हात धरून हिंदुत्वाच्या मुद्यांवर बोलायची आठवण करून देतं होते आणि हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात आणि टेबलवर ठेवलेल्या माईकमध्ये रेकॉर्ड झाल्याने शिंदेंची पुन्हा फजिती झाली आहे. समाज माध्यमावर याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video on Ramdas Kadam with CM Eknath Shinde during Ayodhya Tour check details on 09 April 2023.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x