15 January 2025 5:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका
x

BDD चाळ पुनर्विकास | स्टॅम्प ड्युटी फक्त १ हजार तीही म्हाडा भरणार | ठाकरे सरकारकडून मोठं गिफ्ट

BDD Chawl redevelopment

मुंबई, १८ ऑगस्ट | मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचं भूमीपूजन काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलं होतं. यावेळी राज्य सरकारमधील मंत्री आणि महत्वाचे नेते उपस्थित होते. बीडीडी चाळकरांचं पुनर्वसन होणार असून यात प्रत्येक घरमालकाला कोणतंही शुल्क न आकारता ५०० स्वेअरफुटांचा फ्लॅट दिला जाणार आहे. यानंतर आता बीडीडी चाळकरांना ठाकरे सरकारनं आणखी एक मोठं गिफ्ट दिलं आहे.

मूळ सदनिकाधारकांसाठी अवघी १ हजार रुपये स्टॅम्पड्युटी आकारण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसंच ही स्टॅम्पड्युटी मूळ सदनिका मालक नव्हे, तर म्हाडाकडून भरली जाणार आहे. त्यामुळे बीडीडी चाळकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात मंत्रिमंडळानं काही महत्वाचे निर्णय घेतले. यात बीडीडी चाळकरांच्या पुनर्विकासाबाबतच्या निर्णयात मूळ सदनिकाधारकांना नाममात्र १ हजार रुपये स्टॅम्प ड्युटी आकारण्याचं ठरविण्यात आलं. यासोबत लॉकडाऊन काळात उत्पादिक दूध भुकटी महानंदला वर्किंग स्टॉक म्हणून उपलब्ध देण्याबाबतचा निर्णय राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्धविकास महामंडळाकडून घेण्यात आला आहे.

मुंबई विकास विभागामार्फत (बी.डी.डी.) सन 1921-1925 च्या दरम्यान मुंबई येथील वरळी, नायगाव, ना.म.जोशी मार्ग व शिवडी येथे एकूण 207 चाळी बांधण्यात आल्या आहेत. प्रत्येक चाळ ही तळ + 3 मजल्यांची असून त्यात प्रत्येकी जवळपास 80 रहिवाशी गाळे आहेत. सदरच्या चाळी या जवळपास 96 वर्षे जुन्या झालेल्या असून, मोडकळीस आलेल्या आहेत. त्यामुळे बी.डी.डी. चाळींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या मान्यतेने गृहनिर्माण विभागामार्फत शासन निर्णयान्वये घेण्यात आला. निर्णयानुसार बी.डी.डी. चाळींचा पुनर्विकास म्हाडामार्फत करण्यात येणार असून, या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये जवळपास 15,584 भाडेकरुंचे पुनर्वसन करणे नियोजित आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BDD Chawl redevelopment only one thousand rupees stamp duty to owners will paid by Mhada news updates.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x