15 January 2025 11:40 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना
x

अंधेरीत उत्तर-भारतीय महासंमेलन; राम मंदिर निर्माणाच्या नावाने सेनेत प्रवेशाचा स्टंट, खरं कारण हे आहे?

मुंबई : येत्या २५ किंवा २६ तारखेला अंधेरी पूर्व येथे उत्तर-भारतीय महासंमेलनच्या तयारीने जोर धरला आहे. कारण इथले माजी काँग्रेस नगरसेवक कलमलेश राय हे उत्तर-भारतीय महासंमेलनच्या नावाने शक्तिप्रदर्शन करत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत असं समजतं. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या संमेलनाला संबोधित करणार असल्याचे वृत्त आहे.

संजय निरुपम समर्थक समजले जाणारे काँग्रेसचे माजी नगरसेवक कमलेश राय सध्या संजय निरुपम याच्यासोबत राजकीय मतभेद झाल्याचे कारण पुढे करत आहेत. तसेच मी केवळ अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी शिवसेनेत प्रवेश करत आहे, असा बहाणा करत अंधेरी पूर्वेला उत्तर-भारतीय महासंमेलन आयोजित करण्याची योजना आखत आहेत. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले आहे. असे असले तरी आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वेगळेच व्यक्तिगत कारण समोर येत आहे.

काँग्रेसचे माजी नगरसेवक कमलेश राय यांचे अंधेरी पूर्व मरोळ येथे एक अनधिकृत ‘लॉजिंग बोर्डिंग’ बांधकाम होते. त्यावर काही दिवसांपूर्वी महापालिकेने कारवाई करत हातोडा फिरवला आहे. तसेच असं अनधिकृत बांधकाम असल्यास निवडणूक लढविणे सुद्धा भविष्यात कठीण होऊ शकते याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केल्यास अभय मिळण्याची शक्यता असल्याने राम मंदिरांच्या निर्माणासाठी समर्थन, असा गाजावाजा करत शिवसेनेत प्रवेश करण्याची तयारी कमलेश राय यांनी सुरु केली आहे. त्यांच्यासोबत घनश्याम दुबे हे शिवसेना प्रवेश करणार असल्याचे समजते.

सध्या शिवसेनेत उत्तर भारतीय नेत्यांची मोठी भरतीच सुरु झाली आहे. त्यात शिवसेनेच्या खात्यातील विद्यमान आमदारकीच्या जागा राखण्याचं मोठं आवाहन असणार आहे. सध्या शिवसेनेचे रमेश लटके येथून आमदार आहेत. युती न झाल्यास आणि त्यांच्याविरुद्ध भाजपने जर विद्यमान नगरसेवक मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्यास रमेश लटके यांचा मार्ग कठीण होईल. त्यात विशेष बाब म्हणजे या विधानसभा मतदारसंघातील अजून काही नगरसेवक खोट्या जातीच्या दाखल्यामुळे कोर्टकचेरीत अडकल्याचे वृत्त आहे. परंतु, त्यात पुन्हा काँग्रेसचे माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास तेच प्रबळ दावेदार ठरतील. कारण त्यांना मानणारा मोठा उत्तर भारतीय आणि मराठी समाज येथे आहे. तसेच भाजपचे संभाव्य उमेदवार मुरजी पटेल यांच्यासोबत असलेले अनेक कार्यकर्ते पूर्वाश्रमीचे काँग्रेस कार्यकर्ते असल्याने ते कधी काँग्रेसचे माजी मंत्री सुरेश शेट्टी यांना जाऊन भेटतील ते सांगता येत नाही.

त्यामुळे अंधेरी पूर्वेकडील हातात असलेली शिवसेनेची आमदारकीची जागा शिवसेना मजबूत करण्याची तयारी करत आहे. मराठी मतदार गृहीत धरून उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी उत्तर भारतीय नेत्यांना मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश देण्याचे प्रकार सुरु आहेत. त्यासाठी अयोध्यावारी आणि राम मंदिर निर्माण सारखे विषय पुढे रेटून स्वतःचे राजकीय स्वार्थ पूर्ण करण्याचे स्टंट या मतदार संघात आखले जात आहेत.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x